भारतासोबत (India) प्रलंबित मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी पाकिस्तान (Pakistan) तयार असल्याची भुमिका पाकिस्तान परराष्ट्र मंत्री महमूद कुरेशी (Mehmood Qureshi) यांनी मांडली आहे. तर शनिवारी एका इफ्तार पार्टीमध्ये याबद्दल म्हटले आहे. तसेच भारताच्या नव्या सरकारसोबत चर्चा करण्यास तयार आहोत असे त्यांनी म्हटले आहे.
भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशात शांतता आणि समृद्धीसाठी काही मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी पाकिस्तान तयार असल्याचे कुरेशी यांनी म्हटले आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ऐतिहासिक विजयावर पाकिस्तान पंतप्रधान इम्रान खान यांनी त्यांचे अभिनंदन केले.(कंगाल झालेल्या पाकिस्तानचा गरिबीचा नवा रेकॉर्ड; 1 डॉलरचे मूल्य झाले 150 पाकिस्तानी रुपये)
यापूर्वी सुद्धा इम्रान खान यांनी भारत पाकिस्तान या दोन देशांदरम्यान शांततेसाठ आणि काश्मीरच्या मुद्द्यावरुन चर्चा होऊ शकते असे म्हटले होते. तसेच पुन्हा एकदा नरेंद्र मोदी हे पंतप्रधान व्हावे अशी इच्छा इम्रान खान यांनी व्यक्त केली होती.