Russia-Ukraine War: रशियाशी चर्चा करण्यासाठी तयार झाले झेलेन्स्की; म्हणाले, 'करार झाला नाही तर होऊ शकते तिसरे महायुद्ध'
Volodymyr Zelenskyy (PC - Instagram)

Russia-Ukraine War: युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष Volodymyr Zelenskyy यांनी रशियाशी वाटाघाटी करण्यास तयार असल्याचं म्हटलं आहे. त्याचबरोबर रशियाशी चर्चा अयशस्वी झाल्यास तिसरे महायुद्ध भडकू शकते, असा इशाराही झेलेन्स्की यांनी दिला आहे. वृत्तसंस्था एएनआयने सीएनएनच्या हवाल्याने म्हटले आहे की, झेलेन्स्की म्हणाले, 'मी पुतिन यांच्याशी चर्चेसाठी तयार आहे. मला वाटते की आपण हे युद्ध संवादाशिवाय संपवू शकत नाही.'

झेलेन्स्की पुढे म्हणाले, “मला वाटते की आम्हाला चर्चेसाठी कोणत्याही स्वरूपाचा किंवा कोणत्याही संधीचा वापर करावा लागेल. पण जर हे प्रयत्न अयशस्वी झाले तर त्याचा अर्थ तिसरे महायुद्ध होऊ शकते." (हेही वाचा - Imran Khan On India: पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी केलं हिंदुस्थानचं कौतुक; म्हणाले, 'आज मी भारताला सलाम करतो')

दरम्यान, युक्रेनच्या आग्नेय शहरातील मारियुपोलमधील मानवतावादी परिस्थिती सतत खालावत चालली आहे. हल्ला सुरू झाल्यापासून शहरात हजारो नागरिक मारले गेल्याचा अंदाज आहे. रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने वारंवार युक्रेनच्या सशस्त्र दलाच्या अझोव्ह बटालियनवर मानवी हक्कांचे उल्लंघन केल्याचा आरोप केला आहे. (वाचा - Russia-Ukraine War: रशियाच्या लष्करी हल्ल्यात युक्रेनचा Mariupol Steel Plant उद्ध्वस्त; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल)

याशिवाय पोप फ्रान्सिस यांनी युक्रेन विरुद्ध रशियाच्या युद्धाचे "क्रूर आणि मानवतेला अपवित्र" अशा शब्दांत वर्णन केले आहे. 24 फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या रशियन हल्ल्यानंतरच्या सर्वात कठोर टिप्पणीमध्ये, फ्रान्सिस यांनी रविवारी सेंट पीटर्स स्क्वेअरमध्ये हजारो लोकांना संबोधित केले आणि सांगितले की युक्रेनमध्ये दडपशाही दररोज वाढत आहे. त्यांनी याला घृणास्पद आणि "अर्थहीन नरसंहार" म्हटले आहे.

पोप यांनी रशियाचे नाव न घेता युक्रेनमधील नागरिकांविरुद्धच्या युद्धाच्या भीषणतेवर टीका केली. त्यांनी 'आंतरराष्ट्रीय समुदायातील सर्व व्यक्तींना' युद्ध संपवण्याच्या दिशेने प्रयत्न करण्याचे आवाहन केले.