प्रातिनिधीक प्रतिमा (Gun-encounter)

अमेरिकेमध्ये (United States OF America) मागील काही दिवसांमध्ये गोळीबाराच्या अनेक घटना आल्या आहेत. अमेरिकेच्या व्हर्जिनिया Virginia मध्ये शुक्रवारी एका सहा वर्षीय विद्यार्थ्याने आपल्या शिक्षिकेवर हल्ला केला आहे. मीडीया रिपोर्ट्सनुसार पोलिसांच्या माहितीनुसार हा हल्ला अपघाताने घडला नसून त्याने लक्ष्य करून शिक्षिकेवर गोळीबार केला. यामध्ये महिला गंभीर जखमी झाली आहे. ही घटना Richneck Elementary School मधील आहे. वादातून विद्यार्थ्याने शिक्षिकेवर गोळीबार केला असल्याचं सांगितलं जात आहे.

दरम्यान Richneck Elementary School मध्ये कोणीही विद्यार्थी जखमी झालेला नाही. घटनेनंतर पोलिसांनी विद्यार्थ्याला अटक केली आहे. गंभीररित्या जखमी झालेली शिक्षिका तिशीतील आहे. Schools Superintendent, Dr. George Parker यांनी प्रतिक्रिया देताना, ही घटना धक्कादायक असल्याचं म्हटलं आहे. मुलांना सहज उपलब्ध होणार्‍या बंदुका आणि त्यामधून वाढणार्‍या या घटना यापासून दूर करण्यासाठी खास प्रयत्न करावे लागणार असल्याचं म्हटलं आहे.

पोलिसांकडूनही आरोपीकडून अशाप्रकारच्या घटना यापूर्वीही घडल्या आहेत का? याची तपासणी सुरू आहे. तसेच त्याच्या पालकांसोबतही संपर्क साधण्याचा प्रयत्न आहे. व्हर्जिनिया डिपार्टमेंट ऑफ एज्युकेशनच्या वेबसाइटनुसार Richneck Elementary School मध्ये सुमारे 550 विद्यार्थी आहेत जे किंडरगार्टनमध्ये पाचव्या इयत्तेपर्यंत आहेत. सोमवारी शाळेत वर्ग होणार नसल्याचे शाळेच्या अधिकाऱ्यांनी आधीच सांगितले आहे. नक्की वाचा: अमेरिकेमध्ये St Louis शाळेत 19 वर्षीय व्यक्तीकडून अंदाधूंद गोळीबार; 3 ठार, 7 जखमी .

अमेरिकेमध्ये मागील वर्षभरामध्ये 44 हजार जणांचा मृत्यू गोळीबार मध्ये झाला आहे. त्यापैकी निम्मे मर्डर, अपघात आणि आत्महत्येच्या घटना आहेत.