जर तुम्हाला कोणी सांगितले की, जुळी मुले ही वेगवेगळ्या वर्षात जन्मली तर तुम्हाला विश्वास बसेल का? तुम्ही यावर आधी हसाल आणि तुम्हाला प्रश्न पडेल की असे कसे होऊ शकते. परंतु अशी घटना खरंच घडली असून अमेरिकेतील कॅलिफोर्नियातील एका महिलेने जुळ्या भावंडांना जन्म तर दिला. पण त्यांचे जन्मवर्ष बदलले गेले आहे.(परदेशातील व्यक्तीसोबत लग्न करण्यासाठी 'या' सरकारकडून घ्यावी लागणार NOC, निर्णयामुळे उडाला गोंधळ)
कॅलिफोर्नियातील जुळा भाऊ-बहिण हे वेगवेगळ्या वर्षात जन्मले आहेत. ग्रीनफिल्ड शहरातील दांपत्त्य फातिमा मेड्रिगल आणि रॉबर्ट ट्रुजिलो यांच्या घरी जुळी मुले जन्माला आली. तर मेड्रिगल हिला 31 डिसेंबरला रुग्णालयात भरती करण्यात आले. तेथे रात्री 11.45 मिनिटांनी तिने एका मुलाला जन्म दिला. त्यानंतर अवघ्या 15 मिनिटांनी जेव्हा नवं वर्ष 2022 सुरु झाले तेव्हा तिने एका गोंडस मुलीला जन्म दिला. यामुळेच आता दोन्ही जुळ्या मुलांचे जन्मवर्ष बदलले गेले आहे.
या जुळ्या मुलांमध्ये अल्फ्रेडो असे मुलाचे नाव तर मुलीचे नाव आयलिन असे ठेवण्यात आले आहे. आयलिन हिचा जन्म 2022 चे वर्ष सुरु झाल्यानंतर मध्यरात्री झाला. तर तिचा भाऊ अल्फ्रेडो याचा जन्म तिच्या 15 मिनिट आधी म्हणजे 2021 मध्ये झाला. नेटिविडाड मेडिकल सेंटर आणि रुग्णालयाने आपल्या फेसबुक पेजवर जुळी मुले आणि त्यांच्या आईचा फोटो शेअर केला आहे.(मुलीच्या नावावर आईने कॉलेज मध्ये घेतला प्रवेश, विद्यार्थ्यांसोबत सुद्धा ठेवले संबंध)
रुग्णालयाने असे म्हटले की, दोन्ही मुलांची प्रकृती स्थिर आहे. जन्माच्या वेळी आयलिनचे वजन 5 पाउंड, 14 औंस (2.66 किलोग्रॅम) आणि अल्फ्रेडोचे वजन 6 पाउंड, 1 औंस (2.75 किलोग्रॅम) होते. दोघांच्या जन्मानंतर आई फातिमा मेड्रिगल यांनी आनंद व्यक्त केला. तिने असे म्हटले की, मला जुळी मुले झाली असून त्यांचे जन्मवर्ष मात्र बदलले आहे. हैराण करणारी ही घटना असून सर्वांना याचे आश्चर्य वाटत आहे. त्यांना तीन मुले आहेत. यामध्ये दोन मुली आणि एक मुलगा आहे. त्यामुळे आता एकूण पाच भावंडे असून सर्वजण आनंदात आहेत.