पाहा व्हिडिओ- डोक नसलेला कोंबडा घेतोय समुद्राचा आनंद
फोटो सौजन्य- Antarctic Division Twitter account

समुद्राच्या तळाला विविध रंगांनी सजलेली एक आगळी वेगळी दुनिया आपल्याला पाहायला मिळते. तसेच विविध जाती- प्रजातींचे सुद्धा मनोहर दर्शन आपल्याला घडते. मात्र गेल्या दोन दिवसांपूर्वी डोक नसलेला कोंबडा म्हणून नाव पडलेल्या एका नव्या प्रजातीचा शोध लागला आहे. तर सोशल मीडियावर या डोक नसलेल्या कोंबड्याचे फोटो आणि व्हिडिओसुद्धा व्हायरल झाला आहे.

रविवारी दक्षिण समुद्रात सापडेल्या एका आगळ्या वेगळ्या प्रजातीने सर्वांना चकित करुन सोडले आहे. तसेच त्याला नेटकऱ्यांनी डोक नसलेला कोंबडा (Headless Chiken Monster) असं नाव ठेवले आहे. या व्हिडिओतील कोंबडा लाल रंगाचा असून त्याचे  डोकेच गायब आहे. एवढच नसून ऑस्ट्रेलियाच्या संशोधकांनी या कोंबड्याचे फोटो काढण्यासाठी विशिष्ठ पद्धतींचे कॅमेरे वापरले आहेत.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या Headless Chiken Monster चे Deep Sea Cucumber या माश्यांच्या प्रजातीमध्ये वर्गीकरण होते. तर याचे वैज्ञानिक नाव Enypniasties Eximia असं आहे. यापूर्वी 2017 मध्ये तो मेक्सिकोच्या एका खाडीमध्ये आढळून आला होता.