Demansia cyanochasma: ऑस्ट्रेलियात सापडली विषारी सापाची नवी प्रजाती, नाव घ्या जाणून
Snak (Photo Credits: Pixabay)

Demansia Cyanochasma: विषारी सापाची नवी प्रजात ऑस्ट्रेलियात (Australia) आढळून आली आहे. जगभरातील विविध देशांमध्ये आढळणाऱ्या इतर कोणत्याही सापापेक्षा ही प्रजाती अधिक विषारी असल्याचे आढळून आले आहे. 'द न्यूयॉर्क पोस्ट'ने दिलेल्या वृत्तानुसार अॅडलेड विद्यापीठातील (University of Adelaide) संशोधकांना वाळवंटी प्रदेशात ही काहीशा निळसर रंगाची प्रजाती आढळून आली. हा साप इतर सापांपेक्षा काहीसा वेगळा भासतो, असे तज्ज्ञांनी म्हटले आहे.

अभ्यासकांनी या सापाला डेमॅनसिया सायनोकास्मा (Demansia Cyanochasma) असे नाव दिले आहे. ज्याचा लॅटीन भाषेतील अर्थ निळसर असा होतो. ऑस्ट्रेलिया खंडात आढळणाऱ्या या सापाची वाढ साधारण साप सुमारे 90 सेंटीमीटरपर्यंत वाढू शकतो. पण, या सापाचे वैशिष्ट असे की, त्यांना साप अत्यंत घाबरट आणि लाजाळू म्हणून उल्लेखीत करता येऊ शकते. कारण, ते त्यांच्या सवयीच्या क्षेत्राबाहेर फारसे जात नाहीत. तसेच काही वेगळी हालचाल आढळून आले की ते लगेच धूम ठोकतात, त्यामुळे मनवाने घाबरुन जाऊ नये,असेही संशोधकांनी म्हटले आहे.

नव्याने आढळून आलेल्या विषारी सापाच्या प्रजातीचा दंश झाल्यास संबंधित प्राणी, मानवास गंभीर इजा होऊ शकते. रुग्ण दगावण्याचीही शक्यता असते. ऑस्ट्रेलियात आढळलेला हा एक वेगाने फिरणारा, सडपातळ साप आहे. जो साप दिवसाच्या उजेडात अधिक सक्रीय असतो. त्याला सरड्याची शिकर करायला आवडते. आपल्या विषाद्वारेच तो सरड्याला मारत असतो आणि मग भक्षण करत असतो. आणि त्याचा वेग वापरून सरड्यांचा पाठलाग करतो. हा अभ्यास ऑस्ट्रेलियाच्या वाळवंटात राहणाऱ्या सरपटणाऱ्या प्राण्यांच्या समृद्ध विविधतेवर प्रकाश टाकत आहे, डॉ नानकीवेल म्हणाले. ते या संशोधनाच्या चमूतील एक घटक आहेत.

साप म्हटलं की अनेकांची भीतीने गाळण उडते. लोक सापाला शत्रू मानतात. अनेकदा भाषा, भाषव्यवहारांमध्येही तसे वाक्चप्रचार वापरले जातात. परंतू, साप हा मानवाचा मित्र आहे. खऱ्या अर्थाने तो शेतकऱ्यांचा मित्र म्हणून ओळकला जातो. तो भूतलावावरील अन्नसाखळीचाही एक भाग आहे. त्यामुळे सर्पमित्र सापाला मारू नका. त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडून द्या असे अवाहन करतात.