USA मध्ये आधी पतीचा खून, नंतर चालत्या कार मधून पोटच्या मुलींना फेकत झाडावर कार आदळून Astrology Influencer ची आत्महत्या
Death/ Murder Representative Image Pixabay

अमेरिकेच्या (USA)  लॉस एंजलेस मध्ये एका महिलेने आधी पतीचा खून करून दोन मुलींना घेऊन पळ काढताना कार अपघातात स्वतःचा देखील जीव गमावल्याचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. Danielle ही ज्योतिषी आणि सोशल मीडीया इन्फ्लुअंसर होती. 34 वर्षीय जॉन्सनने पती Jaelen Allen Chaney चा खून केला असून लॉस एंजलेसच्या फ्री वे वर चालत्या एसयूव्ही मधून पोटच्या मुलींना फेकून दिले. तिच्या ऑनलाईन पोस्ट मध्ये पोलिसांना या हत्याकांडामागील धागेदोरे सापडले आहेत. तिने 8 एप्रिलच्या सूर्यग्रहणाला आध्यात्मिक युद्धाचे प्रतीक म्हटलं होतं. नंतर तिचा देखील अपघातामध्ये मृत्यू झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेच्या अर्धा तासातच पॅसिफिक कोस्ट हायवे वर अपघात झाला. घरामध्ये पोलिसांना रक्ताचे डाग आणि पतीचा मृतदेह आढळला. तिच्या मुली 9 वर्षाची आणि अवघ्या 8 महिन्यांची आहे. यामध्ये लहान मुलीचा मृत्यू झाला असून मोठ्या मुलीला जखमी अवस्थेमध्ये हॉस्पिटल मध्ये दाखल केले आहे. रिपोर्ट्सनुसार Danielle चा पती सोबत वाद झाला होता. त्यानंतर तिने हे टोकाचं पाऊल उचललं होतं.

जॉन्सनच्या सोशल मीडीया वर अनेक प्रकारच्या पोस्ट आहेत. ज्यात ज्योतिष,

conspiracy theories, अध्यात्मिक मेसेज आणि काही disturbing content चा समावेश आहे. यामध्ये काही वेळेस जगाचा अंत होणार असल्याचंही म्हटलं आहे. तिचा ऑनलाईन वावर असला तरीही तिच्या शेजार्‍यांनी तिचा स्वभाव रिझर्व्ह असल्याचं म्हटलं आहे.