US: अमेरिकेत भारतीय वंशाच्या मुलीची हत्या; कोर्टाने दोषीला सुनावली 100 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा
Arrested | (File Image)

अमेरिकेतील (US) एका 35 वर्षीय व्यक्तीला भारतीय वंशाच्या मुलीच्या (Indian-Origin Girl) हत्येप्रकरणी 100 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. 2021 मध्ये अमेरिकेच्या लुईझियाना राज्यात भांडणादरम्यान आरोपीने गोळीबार केला होता. यावेळी बंदुकीमधून सुटलेली गोळी जवळच्या हॉटेलमध्ये खेळणाऱ्या मुलीच्या डोक्याला लागली होती. गोळी लागल्याने मुलीचा मृत्यू झाला होता, त्यावर आता न्यायालयाने दोषीला 100 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे.

जोसेफ ली स्मिथला (Joseph Lee Smith) जानेवारी महिन्यात 5 वर्षीय माया पटेलच्या मृत्यूप्रकरणी दोषी ठरवण्यात आले होते. घटनेच्या वेळी माया पटेल हॉटेलच्या खोलीत खेळत होती, त्यादरम्यान तिच्या डोक्यात गोळी लागली. गोळी लागल्याने जखमी झालेल्या मुलीला रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे 23 मार्च 2021 रोजी तीन दिवस जीवन आणि मृत्यूशी झुंज दिल्यानंतर मायाचा मृत्यू झाला.

हॉटेल सुपर 8 मोटेलच्या पार्किंगमध्ये आरोपी जोसेफ ली स्मिथ एका दुसऱ्या व्यक्तीशी भांडत होता. या भांडणात स्मिथने एक गोळी झाडली जी त्याच्याशी भांडण करणाऱ्या व्यक्तीला नाही तर जवळच्या खोलीत खेळत असलेल्या मायाच्या डोक्यात लागली. मायाचे आई-वडील विमल आणि स्नेहल पटेल या हॉटेलचे मालक आहेत आणि त्यांचे कुटुंब मॉटेलच्या तळमजल्यावर राहते. (हेही वाचा: New York: लाजिरवाणे कृत्य! TSA एजंटने JFK विमानतळावर ट्रान्सजेंडर महिलेलेच्या गुप्तांगावर मारला ठोसा; पीडितेने सोशल मीडियावर मांडली व्यथा)

जिल्हा न्यायाधीश जॉन डी मोसेले यांनी स्मिथला मुलीच्या हत्येसाठी जामीन किंवा पॅरोलशिवाय 60 वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. याशिवाय न्यायात अडथळा आणल्याप्रकरणी आणि अन्य एका प्रकरणात त्याला 20-20 वर्षांची शिक्षा झाली होती. अशा प्रकारे स्मिथला एकूण 100 वर्षांची शिक्षा झाली आहे.