डोनाल्ड ट्रंम्प आणि जो बिडेन (Photo Credits-ANI)

US Election 2020:  अमेरिकेत पार पडणाऱ्या राष्ट्राध्यक्ष निवडणूकीसंदर्भातील एक मोठी बातमी समोर येत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंम्प (Donald Trump) आणि डेमोक्रेटिक पार्टीचे उमेदवार जो बिडेन (Joe Biden) यांच्या मध्ये पार पडणारी दुसरी Presidential Debate रद्द केली गेली आहे. कमीशन ऑन प्रेसिडेंशिलअल डिबेट्सने (Commission on presidential debates) राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंम्प आणि बिडेन यांच्यामध्ये होणारी डिबेट रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. आता ही डिबेट रद्द झाल्यानंतर येत्या 22 ऑक्टोंबरला तिसरी डिबेट पार पडण्याची शक्यता आहे.

कमिशन ऑन प्रेसिडेंशिअल डिबेट्सने एका विधानात असे म्हटले आहे की, 15 ऑक्टोंबरला डिबेट होणार नाही आहे. कमीशन यांनी म्हटले की, सर्व उमेदवारांना 15 ऑक्टोंबरच्या आपल्या योजनेबद्दल सुचित केले जाणार आहे. यापूर्वी गेल्या काही दिवसात डोनाल्ड ट्रम्प यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यावेळी ट्रम्प यांनी मी 15 ऑक्टोंबरला पार पडणाऱ्या दुसऱ्या प्रेसिडेंशिअल डिबेटसाठी पूर्णपणे फिट असल्याचे म्हटले होते.(US President Donald Trump यांनी 2017 मध्ये भारतामध्ये भरला 1,45,400 डॉलर्सचा कर, तर अमेरिकेमध्ये जमा केले फक्त 750 डॉलर्स; 2016 आधी 15 पैकी 10 वर्षांत कर भरलाच नाही)

राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर 15 ऑक्टोंबरला पार पडणाऱ्या डिबेटमध्ये डिजिटल पद्धतीने सहभागी होणार असल्याचा निर्णय घेतला होता. पण वर्च्युअल पद्धतीने पार पडणाऱ्या डिबेटमध्ये ट्रंम्प यांना सहभागी होण्यास नकार दिला गेला. यामुळे ट्रंम्प यांनी वेळ फुकट घालवत असल्याचे म्हटले होते. तर दुसऱ्या बाजूला डेमोक्रेटिक पार्टीचे उमेदवार जी बिडेन यांनी दुसऱ्या डिबेटवर संशय व्यक्त केला होता.

कोरोनावर उपचार घेतल्यानंक डोनाल्ड ट्रंम्प व्हाईट हाऊसवर परतले आहेत. ट्रंम्प यांनी राष्ट्राध्य पदासाठी पार पडणाऱ्या निवडकीसाठी रॅली काढण्याची इच्छा व्यक्त केली आहे. तर डॉक्टरांचे असे म्हणणे आहे की, ट्रंम्प यांच्यावरील कोरोनासंदर्भातील उपचार पूर्ण झाले आहेत. त्यामुळे ते आता निवडणूकीसाठी प्रचार सुरु करु शकतात. दरम्यान, गेल्या गुरुवारी ट्रंम्प आणि फर्स्ट लेडी मेलानिया यांचे कोरोनाचे रिपोर्ट्स पॉझिटिव्ह आले होते. प्रकृती बिघडल्याने ट्रंम्प यांना सैन्याच्या रुग्णालयात दाखल केले गेले. त्यानंतर सोमवारी ट्रंम्प यांना डिस्चार्च दिला गेला.