Coronavirus Outbreak (Photo Credits: AFP)

चीन मधील वुहान शहरातून लागण झालेल्या कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले आहे. याचा फटका प्रत्येक देशाला बसला असून त्याच्या विरोधात लढण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. सध्या चीन मध्ये परिस्थिती पूर्ववत जरी झाली असली तरीही कोरोनाचा फटका अमेरिका, इटली सारख्या अन्य बड्या देशांना बसला आहे. अमेरिकेत गेल्या 24 तासात कोरोना व्हायरसमुळे 1813 जणांचा बळी गेला आहे. त्यामुळे अमेरिकेत कोरोनाच्या बळींचा एकूण आकडा 84,059 वर पोहचल्याची माहिती AFP यांनी दिली आहे.गेल्या काही दिवसांपूर्वी अमेरिकेतील एक्सपर्ट डॉ. अँथोनी फॉकी यांनी असे म्हटले होते की, अमेरिकेत लॉकडाउन हटवण्याचा निर्णय घेताना घाई करु नये. अन्यथा देशाचे फार मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.  एका पत्रकार परिषदेत डोनाल्ड ट्रम्प यांनी शाळा सुरु करण्यासाठी तयारी करण्याचे आदेश दिले होते. परंतु फॉकी यांनी शाळा अद्याप सुरु करु नयेत असे स्पष्ट केले.

मेरिकेत कोरोनाबाधितांचा आकडा दिवसागणिक वेगाने वाढत आहे. तरीही अमेरिका राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे देशातील लॉकडाउन हटवण्यावर जोर देत आहेत. लॉकडाउन हटवल्यास अर्थव्यवस्थेला चालना मिळेल असा डोनाल्ड ट्रम्प यांचा हेतू आहे. तसेच नागरिकांना सुद्धा पुन्हा त्यांच्या नोकऱ्यांवर जाता येईल असे ही ट्रम्प यांचे म्हणणे आहे. याच दरम्यान, असे ही बोलले जात आहे की नोकऱ्यांवर परतलेल्या कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी व्हाईट हाउसमधील ट्रम्प यांच्या सहकाऱ्याला सुद्धा कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. Coronavirus: यूएस राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प कन्या इवांका ट्रम्प यांच्या खासगी स्वीय सहायकास कोविड 19 विषाणूची बाधा

आतापर्यंत जगभरात कोरोनाचे संक्रमण 44 लाख जणांना झाले आहे. तर 3 लाख जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. काही देशांनी त्यांच्या येथे लॉकडाउनचे नियम शिथील करण्यात येत आहे. इटलीष फ्रान्स सारख्या देशात सुद्धा लॉकडाउचे नियम शिथील करण्यात येत असून हळूहळू काही गोष्टी सुरु करण्यात येत आहेत.