US 2024 Presidential Elections: Hirsh Vardhan Singh निवडणूकीच्या रिंगणात उतरण्यात इच्छूक;   Republican Party मधील भारतीय वंशाचा तिसरा उमेदवार
Hirsh Vardhan Singh (Photo Credits: Twitter Video Grab)

अमेरिकेमध्ये आता 2024 च्या निवडणूकीचे वेध लागायला लागले आहेत. 38 वर्षीय भारतीय वंशाच्या अमेरिकन इंजिनियर Hirsh Vardhan Singh यांनी या निवडणूकीत राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीत उतरण्याची घोषणा केली आहे. Nikki Haley आणि Vivek Ramaswamy, यांच्यानंतर, पक्षाच्या नामांकनासाठी इच्छुक असलेल्या रिपब्लिकन पक्षाच्या उमेदवारांच्या तीव्र स्पर्धांमध्ये सामील होणारे ते भारतीय वंशाचे तिसरे व्यक्ती बनले आहेत.

Singh यांनी ट्वीटर वर एक 3 मिनिटांचा व्हिडिओ शेअर केला आहे. त्यामध्ये त्यांनी अभिमानाने स्वतःला "lifelong Republican" आणि कट्टर "America First" असा कंझर्व्हेटिव्ह म्हणून घोषित केले आहे. त्यांनी न्यू जर्सी मध्ये Republican Party ला रिस्टोअर करण्याच्या कामामधील योगदानाची माहिती दिली आहे. त्यांच्या संदेशाचा केंद्रबिंदू हाच होता की आता अमेरिकन मूळ संकल्पनांना पुन्हा आणण्यासाठी एका भक्कम नेतृत्त्वाची कशी गरज आहे.

Hirsh Vardhan Singh यांचा राजकारणातील प्रवास आव्हानांनी भरलेला आहे. 2017 आणि 2021 मध्ये न्यू जर्सीचे गव्हर्नर, 2018 मध्ये सभागृहाची जागा आणि 2020 मध्ये सिनेटची जागा अशा विविध पदांसाठी त्यांनी रिपब्लिकन प्राइमरीमध्ये याआधी शर्यतीमध्ये होते. त्या प्रसंगी रिपब्लिकन पक्षाचे नामांकन मिळवण्यात ते अयशस्वी ठरले. गव्हर्नरपदासाठीच्या त्याच्या सर्वात अलीकडील बोलीमध्ये, त्यांनी स्वतःला कट्टर कॉन्झर्व्हेटिव्ह म्हणून स्थान दिले, माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी जवळून तुलानात्मक पाहिलं, परंतु नामांकन शर्यतीत शेवटी तिसरे स्थान मिळवले, Jack Ciattarelli यांना त्यावेळी संधी देण्यात आली.

2024 च्या नामांकनासाठी Republican Party मध्ये अनेक जण चर्चेत आहेत. ज्यामध्ये दक्षिण कॅरोलिनाच्या माजी गव्हर्नर निक्की हेली आणि उद्योजक विवेक रामास्वामी आहेत. दोघेही भारतीय वंशाचे हाय प्रोफाइल उमेदवार आहेत. शिवाय, माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे नाव देखील चर्चेत आहे. कायदेशीर आव्हानांचा सामना करूनही ट्र्म्प शर्यतीत आघाडीवर आहेत.