डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर महाभियोग चालवण्याच्या प्रस्तावास अमेरिकी संसदेत मंजूर
Donald Trump | (Photo Credits: Facebook)

Donald Trump Impeachment: राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्यावर महाभियोग चालवण्याच्या प्रस्तावास अमेरिकी संसदेने (United States House) गुरुवारी मंजूरी दिली. महाभियोग प्रस्ताव समर्थनार्थ 232 मतं मिळाली तर 196 मतं महाभियोग प्रस्तावाच्या विरोधात पडली. दोन्ही बाजूना पक्षाच्या धोरणानुसारच मतदान पार पडले. बहुमताने बारीत झालेला हा प्रस्ताव ड्रम्प यांच्यावरील सार्वजनिक महाभियोग चालवण्यास मान्यता देतो. महत्त्वाचे म्हणजे अमेरिकी संसदेत रिपब्लिकन पक्षाची सत्ता आहे.

डेमोक्रेटिक पार्टीने ट्रम्प यांच्यावर आपल्या कार्यालयाचा दूरुपयोग करणे आणि व्यक्तिगत राजकीय फायद्यासाठी राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात घातल्याचा आरोप केला आहे. गुरुवारी झालेल्या मतदानात विरोधी पक्ष असलेल्या डेमोक्रेटिक पक्ष महाभियोग चालवण्याच्या प्रस्तावावर ठाम होते. परंतू, त्यांनी रिपब्लिकन पक्षाचे एकही मत आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न केला नाही हे विशेष. सभागृहाचे अध्यक्ष नैंसी पोलोसी यांनी मतदानापूर्वी सांगितले की, 'आजचा दिवस हा प्रचंड वेदनादाई आहे. राष्ट्राध्यक्षावर राजकीय हल्ला करण्यासाठी संसदेत या मुद्दा कोणीही आणत नाही.'

ट्रम्प यांच्याकडून झालेल्या नियमभाय्य किंवा चुकीच्या कामांबाबत अमेरिकी अधिकाऱ्यांची साक्ष सार्वजनिक ठिकाणी दाखवल्यामुळे अर्थव्यवस्था आणि immigration यांसारखे मुद्दे लोकांमध्ये चर्चेचा विषय ठरु शकतात. या चर्चेचा परिणाम 2020 मध्ये होणाऱ्या राष्ट्रपती पद निवडणुकीत ट्रम्प यांना मोठा फटका बसू शकतो. परंतू, ट्रम्प यांच्या समर्थकांचे म्हणने असे की, महाभियोगांतर्गत चौकशी ही वास्तवात ट्रम्प यांच्या राजकीय विरोधकांच्या तुलनेत ट्रम्प यांची बाजू अधिक भक्कम करेन. (हेही वाचा, डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकी लष्कराच्या कुत्र्याचे केले कौतुक; ISIS म्होरक्या बगदादी याचा खात्मा केल्याबद्दल म्हणाले 'ग्रेट जॉब')

दरम्यान, रिपब्लिकन पक्षाने डेमोक्रेटिक पक्षावर 2020 मध्ये होणारी राष्ट्रपती पद निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन मतदारांना भडकवत असल्याचा आरोप केला आहे. ट्रम्प यांनी इंग्लंडच्या एका रेडिओ चॅनलशी बोलताना म्हटले आहे की, डेमोक्रेटला माहिती आहे की पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकीत ते पराभूत होणार आहेत. त्यामुळे माझी प्रतिमा मलीन करण्यासाठी ते माझ्यावर काहीही आरोप करत आहेत. कारण, ते सध्या नैराश्येत असून, त्यांना माझ्या विरोधात काहीच मिळत नाही.