Rape Case | (Photo credit: archived, edited, representative image)

जगातील विविध देशात बलात्काराचे प्रमाण वाढत चालले आहे. तसेच बलात्कार प्रकरणी अटक केलेल्या आरोपींवर अद्याप कोणताही कडक नियम लागू करण्यात आला नसून त्यांना फक्त जन्मठेपेची शिक्षा सुनावली जाते. मात्र आता युक्रेन (Ukraine) येथे बलात्कार प्रकरणी एक नवीन नियम लागू करण्यात आला आहे. या नव्या नियमानुसार बलात्कार प्रकरणी आरोपीला नपुंसक बनवणारे इंजेक्शन दिले जाणार आहे. यासाठी त्यांना केमिकल कॅस्ट्रॅक्शन नावाचे इंजेक्शन दिले जाणार आहे. हा नियम लागू केल्यानंतर 16 ते 65 वर्षापर्यंतच्या हजारो आरोपींना हे इंजेक्शन दिले जाणार असल्याचे शक्यता आहे.

अल्पवयीन वयोगटातील मुलींसोबत बलात्कार किंवा लैंगिक शोषण करणाऱ्या आरोपींना हे नपुंसक इंजेक्शन दिले जाणार आहे. अमेरिका मधील काही राज्यात हा नियम लागू करण्यात आला आहे. तर नुकताच अमेरिकेच्या अलबामा येथे अशा पद्धतीचा नियम लागू करण्यात आला आहे. एका मीडिया रिपोर्ट नुसार, आरोपींना नपुंसक प्रकारचे इंजेक्शन लावल्यानंतर त्यांची सेक्स करण्याची क्षमता कमी होते. तर 2017 मध्ये युक्रेन येथे अधिकृतरित्या समोर आलेल्या बलात्काराची 320 प्रकरणे आहेत.

(मृत महिलेने दान केलेल्या गर्भाशयातून स्त्री जातीच्या अर्भकाचा जन्म, अमेरिकेतील पहिलीच घटना)

या आठवड्यात युक्रेनच्या पोलिसांनी एकाच दिवसात पाच बलात्कारच्या घटना घडल्याचे शोधून काढले आहे. त्याचसोबत आरोपींना अटक झाल्यानंतर जर सुटका झाल्यास त्यांच्यावर पोलीस करडी नजर ठेवून असणार आहेत. त्याचसोबत बलात्कार प्रकरणी आरोपीला 15 वर्ष शिक्षा सुनावली जाणार आहे.