मृत महिलेने दान केलेल्या गर्भाशयातून स्त्री जातीच्या अर्भकाचा जन्म, अमेरिकेतील पहिलीच घटना
Baby | Image only representative purpose (Photo credit: pxhere)

Baby Born from Dead Donor Transplanted Womb: मृत महिलेने दान केलेल्या गर्भाशयातून अमेरिकेत एका चिमुकलीचा जन्म झाला आहे. विशेष म्हणजे अमेरिकेतील ही पहिलीच घटना आहे. उत्तर अमेरिकेत टॉक्टरांनी एका मृत महिलेच्या गर्भाशयाचे जिवंत महिलेच्या शरीरात प्रत्यारोपण करुन चिमुकलीला यशस्वीरित्या जन्म दिला. अमेरिकेतील क्लीवलैंड क्लिनिकने हा दावा केला आहे. दरम्यान, ही घटना अमेरिकेत पहिल्यादा घडली असली तरी जगातील पहिली मुळीच नाही. या आधी ब्राजील येथील डॉक्टरांनी मृत महिलेचे दान मिळालेले गर्भशय प्रत्यारपोण करुन जगातील पहिले बालक जन्माला घातल्याचा दावा केला होता. या दाव्यानंतर तेव्हा जगभरात बरीच चर्चा सुरु झाली होती.

दरम्यान, उत्तर अमेरिकेतील क्लीवलैंड क्लिनिकने दावा केला आहे की, त्यांनी गर्भाशय ट्रांसप्लांट करुन एक डजनाहून अधिक स्त्री जातीच्या अर्भकांना जन्म दिला आहे. ज्यात गर्भाशय डोनर जिवंत आहेत. या डोनरनी आपले दोस्त, नातेवाईक आदींना गर्भाशय दान केले होते. अशा पद्धतीने अपत्य जन्माला घालण्याची उत्तर अमेरिकेतील ही पहिलीच घटना आहे. (हेही वाचा, ब्राझीलमध्ये मृत महिलेच्या गर्भाशय दानातून गोंडस चिमुकलीचा जन्म, वैद्यकीय इतिहासातील पहिली यशस्वी शस्त्रक्रिया)

मृत महिलेचे गर्भाशय ट्रान्सप्लांट करण्याचा चंग एका स्वीडिश डॉक्टरांनी बांधला होता. महत्त्वाचे म्हणजे या स्वीडिश डॉक्टरने पाच वर्षांपूर्वीच हे ऑपरेशन यशस्वी केले होते. क्लीवलैंड रुग्णालयाने अधिकृत प्रतिक्रिया देत मंगळवारी सांगितले की, या मुलीचा जन्म जूनमध्ये झाला होता. या क्लिनिकने आतापर्यंत पाच गर्भाशयं ट्रान्सप्लांट केली आहेत. ज्यातील तीन यशस्वी ठरली. अन्य दोन महिला इतर महिलांकडून दान झालेल्या नव्या गर्भाशयासोबत प्रयत्नरत आहेत.