Suspended Vice Chancellor of University of Buckingham James Tooley (Photo Credits: X/ @james_tooley)

ब्रिटनच्या बकिंघम विद्यापीठाचे (University of Buckingham) कुलगुरू जेम्स टुली (James Tooley) यांना हैदराबादमधील एका तरुणीशी प्रेमसंबंध असल्याच्या आरोपानंतर निलंबित करण्यात आले आहे. त्यांनी मुलीला तिची विद्यापीठाची फी भरण्यास मदत केल्याचे बोलले जात आहे. भारतीय मुलीने तिच्या डायरीत दावा केला आहे की, तिचे 65 वर्षीय प्रोफेसर टुले यांच्यासोबत शारीरिक संबंध होते. प्राध्यापकाच्या पत्नीने मुलीने लिहिलेल्या डायरीच्या प्रती विद्यापीठाला दिल्यावर हे आरोप समोर आले. टुले यांच्या निलंबनाची घोषणा ऑक्टोबरमध्ये करण्यात आली होती, मात्र ती आताच समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, टूले हे 2020 पासून कुलगुरू पदावर होते.

या आरोपानंतर त्यांनी आपल्या वकिलामार्फत एक निवेदन जारी केले, ज्यामध्ये त्यांनी हे आरोप निराधार असल्याचे म्हटले आहे. हे आरोप टूली यांची 42 वर्षीय पत्नी सिंथिया हिने उघड केले आहेत. सिंथिया मूळची नायजेरियन आहे आणि तिने फेब्रुवारी 2022 मध्ये टूलीशी लग्न केले. टाईम्सच्या रिपोर्टनुसार, डायरीमध्ये भारतीय महिलेने दावा केला आहे की, जेव्हा ती पहिल्यांदा टूलीला भेटली तेव्हा ती 18 वर्षांची होती आणि 21 वर्षांची असताना त्यांचे शारीरिक संबंध सुरू झाले.

रिपोर्टनुसार, हे प्रकरण तेव्हा सुरू झाले जेव्हा टूली हैदराबादमध्ये गरीब समुदायांसाठी कमी किमतीच्या खाजगी शाळांचा प्रकल्प चालवत होते. ते मुलीच्या वडिलांना ओळखत होते आणि तिच्या युनिव्हर्सिटी फीसाठी त्यांनी हातभार लावला होता. भारतीय मुलीने तिच्या डायरीत लिहिले की, 'जो कोणी माझी डायरी वाचेल तो पाहू शकेल, मी त्यांच्यावर प्रेम केले आणि मला त्यांच्यासोबत राहायचे आहे. ते नेहमी माझ्याशी आदराने वागायचे. लोक म्हणतील की त्यांनी माझा वापर केला कारण त्यांच्याकडे सत्ता आणि पैसा होता. पण ते तसे नाही. ते एक चांगले व्यक्ती आहेत, जे इतरांची खूप काळजी घेतात.’ (हेही वाचा: International Students in Canada: पुढील वर्षी 7 लाखांहून अधिक आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना कॅनडा सोडावा लागेल; लाखो भारतीय मुलांचे भविष्य अंधारात, जाणून घ्या कारण)

बकिंघम विद्यापीठ हे यूकेच्या सर्वात जुन्या विद्यापीठांपैकी एक आहे बकिंगहॅमच्या कुलगुरू पदावर तीन अंतरिम प्रमुखांची नियुक्ती करण्यात आली आहे: मुख्य वित्तीय अधिकारी डेव्हिड कोल, मुख्य प्रशासकीय अधिकारी ख्रिस पेन आणि प्रो कुलगुरू हॅरिएट डनबर-मॉरिस. टूली याआधी न्यूकॅसल युनिव्हर्सिटीमध्ये होते. त्यंनी लंडन विद्यापीठाच्या शिक्षण संस्थेतून पीएचडी केली आहे.