Boris Johnson India Visit: ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन एप्रिलमध्ये भारत दौर्‍यावर येणार; 'हा' असेल भेटीमागील हेतू
UK Prime Minister Boris Johnson (PC - ANI)

Boris Johnson India Visit: ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन एप्रिलमध्ये भारत दौर्‍यावर येणार आहेत. बोरिस जॉनसनच्या भारत दौर्‍याचा हेतू यूकेसाठी अधिकाधिक संधींचा शोध घेणे हा असणार आहे. तसेच ब्रिटनच्या पंतप्रधानांच्या या भेटीचा दुसरा हेतू म्हणजे चीनच्या भारताशी असलेल्या युक्तीविरूद्ध उभे राहण. बोरिस जॉनसन प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने प्रमुख पाहुणे म्हणून भारतात येणार होते. परंतु, कोरोना साथीच्या आजारामुळे त्यांचा भारत दौरा रद्द करण्यात आला होता.

बोरिस जॉनसन एप्रिलच्या उत्तरार्धात भारत भेटीवर येणार आहेत. ब्रिटनने युरोपियन युनियनमधून बाहेर पडल्यानंतर जॉनसन कोणत्या देशाला भेट देणार याकडे सर्वांच लक्ष लागलं होतं. याशिवाय अमेरिकेबरोबर आपले मजबूत संबंध टिकवून इंडो-पॅसिफिक प्रदेशात आपला प्रभाव वाढविण्याच्या उद्देशाने ब्रिटीश सरकार मंगळवारी देशातील ब्रेक्झिट संरक्षण आणि परराष्ट्र धोरणाची नीती पुढे ठेवणार आहे. (वाचा - Coronavirus Update: कोरोनाग्रस्ताच्या संख्येत भारताला मागे टाकत ब्राझील जगात दुसऱ्या स्थानावर; इटलीमध्ये कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचा इशारा)

दरम्यान, युरोपियन युनियनमधून बाहेर आल्यानंतर बोरिस जॉन्सन आता ब्रिटनसाठी नवीन शक्यतांचा शोध घेत आहेत. बर्‍याच मुद्द्यांवरून चीन आणि युकेचे मतभेद झालेले आहेत. अशा स्थितीत भारतासमवेत उभे असलेल्या बोरिस जॉन्सन एका दगडाने दोन पक्षी मारण्याचा प्रयत्न करत आहेत. यात काहीही चूक नाही. चीनला वेढण्यासाठी भारत, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया मिळून क्वाड संघटना स्थापन करण्यात आली आहे. सध्या क्वाड संघटना अत्यंत महत्त्वाची संस्था म्हणून पाहिली जात आहे. शीत युद्धाच्या समाप्तीनंतर हा सर्वात उल्लेखनीय जागतिक उपक्रम म्हणून ओळखला जात आहे.