UK Work Visa आता दोन वर्षांसाठी; भारतीय विद्यार्थ्यांसह परदेशी विद्यार्थांना मोठा दिलासा
UK Work Visa (Photo Credits: Pixabay)

ब्रेक्झिटच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या युनायटेड किंग्डममध्ये आता अनेक घडामोडींचा वेग वाढला आहे. नुकताच भारतीयांसह अनेक परदेशी विद्यार्थ्यांसाठी एक मोठी दिलासादायक बातमी आहे. आता उच्च शिक्षणानंतर युके मध्ये देण्यात येणार्‍या व्हिसाच्या मुदतीमध्ये वाढ करण्यात आली आहे. यामुळे आता हजारो विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे. शिक्षण झाल्यानंतर आता नोकरी शोधण्यासाठी विद्यार्थी दोन वर्ष युकेमध्ये राहू शकतात. बुधवार (11 सप्टेंबर) दिवशी युके पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी ही माहिती दिली आहे.

युके मध्ये सध्य स्थितीला पोस्ट ग्रॅज्युएशन, मास्टर डिग्री, बॅचलर डिग्री घेतलेले विद्यार्थी अवघे 4-6 महिने नोकरी शोधण्यासाठी राहू शकत होते. मात्र आता या नियमामध्ये बदल करण्यात आला आहे. 2020-21 पासून कोर्स सुरू करणार्‍या विद्यार्थ्यांना या नव्या व्हिसा नियमाचा फायदा मिळणार आहे. अंडर ग्रॅज्युएट ते वरील सार्‍या कोर्ससाठी हा नियम लागू असेल. ब्रिटीश सरकारच्या सैन्यदलात आता भारतीयांनाही मिळणार संधी

2011 साली होम सेक्रेटरी असलेल्या थेरेसा मे यांनी शिक्षणानंतर 2 वर्ष व्हिसा देण्याच्या प्रस्तावाला नाकारले होते. 31 ऑक्टोबरपर्यंत करार करून वा कोणताही करार न करता युरोपियन युनियन सोडण्यावर नवे पंतप्रधान बोरिस जॉन्सन ठाम आहेत