ब्रिटीश सरकारच्या सैन्यदलात आता भारतीयांनाही मिळणार संधी
ब्रिटीश सैन्यदल Photo Credit : Twitter

ब्रिटीश सरकारने त्यांच्या सशस्त्र दलांतील सैनिकांची कमी भरून काढण्यासाथी आता कॉमनवेल्थ देशातील नागरिकांकडून, जवानांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. आता कॉमनवेल्थ देशांसाठी काही नियम शिथिल करण्यात आले आहेत. ब्रिटीश संरक्षण मंत्रायलाने दिलेल्या माहितीनुसार आर्मी, नौसेना, वायुसेना या दलांमध्ये जवानांची कमी आहे. त्यासाठी सैनिकांना पाच वर्षांसाठी प्रवासात सूट देण्यात आली आहे.

ब्रिटीश सैन्य दलामध्ये भारत, कॅनडा, केनिया या देशातील सैनिकांना स्थान मिळणार आहे. यामध्ये जगभरातील 53 देशांचा सहभाग आहे. तसेच अर्ज करणारा उमेदवार हा 18 वर्षांपेक्षा कमी वयाचा असू नये. ही अट घालण्यात आली आहे.

ब्रिटनमध्ये सध्या 4500 कॉमनवेल्थ राष्ट्रांमधील नागरिकांचा समावेश आहे. त्यापैकी सुमारे 3940 सैनिक आर्मीमध्ये, 480 रॉयल नेव्ही म्हणजेच नौसेनेत आणि 80 सैनिक RAF मध्ये आहेत.