Rishi Sunak | X

ब्रिटीश पंतप्रधान Rishi Sunak यांनी 4 जुलै दिवशी यूके मध्ये जनरल इलेक्शनची घोषणा केली आहे. “आज संसद विसर्जित करण्याची विनंती करण्यासाठी Majesty the King यांच्याशी बोलणं झालं आहे. किंगने ही विनंती मान्य केली आहे आणि आता 4 जुलै रोजी सार्वत्रिक निवडणूक (General Election) होणार आहे." असे ऋषी सुनक यांनी जाहीर केले आहे.

“ मोठ्या कष्टाने मिळवलेले हे आर्थिक स्थैर्य ही केवळ सुरूवात आहे. आता प्रश्न असा आहे की, तुमच्या कुटुंबासाठी आणि आमच्या देशाच्या सुरक्षित भविष्यात बदलण्यासाठी तुमचा कसा आणि कोणावर विश्वास आहे? आता ब्रिटनसाठी आपले भविष्य निवडण्याची वेळ आली आहे, आपण केलेल्या प्रगतीवर आपल्याला उभारायचे आहे की, कोणतीही योजना आणि कोणतीही निश्चितता नसताना, आपल्याला स्क्वेअर वनवर परत जाण्याचा धोका आहे की नाही हे ठरवण्याची वेळ आली आहे, ” असे सुनक म्हणाले तसेच त्यांनी हाती घेतलेल्या मोठ्या धोरणांचाही यावेळी दाखला दिला.

ऑक्टोबर 2022 मध्ये Conservative MPs यांनी संसदेतील सर्वात मोठ्या पक्षाच्या नेत्याची नियुक्ती केल्यानंतर सुनक हे पंतप्रधान म्हणून जनतेला सामोरे जाण्याची ही पहिलीच वेळ आहे. यूके मध्ये 2025 च्या जानेवारी महिन्यात निवडणूक होण्याची शक्यता होती मात्र 7 महिने आधीच ऋषि सुनक यांनी निवडणूकीची घोषणा केली आहे.

निवडणुकीत मुख्य लढत कंझर्व्हेटिव्ह पार्टी आणि लेबर पार्टी  यांच्यात आहे. सुनक हे कंझर्व्हेटिव्ह पार्टीकडून पंतप्रधान पदाचा चेहरा असू शकतात, परंतु त्यांच्या विरोधात लेबर पार्टी चे नेते सर कीर स्टारमर असतील, जे अतिशय मजबूत उमेदवार आहेत. स्टारमर हे इंग्लंडमधील पब्लिक प्रॉसिक्यूटर आणि एप्रिल 2020 पासून मजूर पक्षाचे नेते आहेत.

पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या पक्षाला निवडणुकीत मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागू शकते. असा दावा एका सर्वेक्षणात करण्यात आला आहे. हे सर्वेक्षण 18 हजार लोकांवर आधारित आहे. या सर्वेक्षणात सुनक यांच्या नेतृत्वाखालील कंझर्व्हेटिव्ह पक्षाच्या पराभवाचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच विरोधी लेबर पार्टीला 403 जागा मिळण्याचा अंदाज आहे. ब्रिटिश संसदेत बहुमताचा आकडा 326 आहे.