UK मधील एक्सपर्टचा दावा, भारतात परसलेल्या कोरोनाच्या B1.617.2 वेरियंटवर लस सुद्धा प्रभावी नाही
Coronavirus (Photo Credits-Twitter)

ब्रिटेन (UK) मध्ये कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी दिली जाणारी लस ही व्हायरसच्या B1.617.2 वेरियंटचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कमी प्रभावी आहे. ब्रिटेनचे एक प्रमुख वैज्ञानिक जे युके मधील लसीकरण कार्यक्रमाचे हिस्सा असून त्यांनीच हा शनिवारी (15 मे) दावा केला आहे. कोरोनाच्या B1.617.2 वेरिंट पहिल्यांदाच आढळला होता त्याला काही लोक भारतीय वेरियंट सुद्धा बोलत आहेत. न्यूज एजेंसीच्या मते, कोरोनाच्या B1.617.2 वेरियंटची प्रकरणे युके मध्ये एका आठवड्यात दुप्पट झाली आहेत. अशातच देशातील ज्या भाहात व्हायरसचा हा वेरियंट वेगाने पसरत चालला आहे. तर तपास आणि लसकरणाचा सुद्धा वेग वाढवण्यात आला आहे. B1.617.2 वेरियंट सर्वात प्रथम भारतातील महाराष्ट्रात आढळून आला होता.

ब्रिटेनमध्ये पसरत चालेल्या कोरोनाच्या वेरियंट बद्दल ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीचे प्रोफेसर एंथनी हार्डेन यांनी असे म्हटले आहे की, यामुळे देशात अनलॉक करण्यास समस्या येऊ शकते. कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही की, हा वेरियंट किती वेगाने पसरत आहे. त्याचसोबत त्यांना असा दावा केला की, लस ही नव्या वेरियंटच्या विरोधात कमी प्रभावी ठरु शकते.(काय सांगता? Covid-19 लस घेतल्यावर मिळणार 7 कोटींचे बक्षीस; 'या' राज्याने केली लॉटरीची घोषणा)

यापूर्वी युकेचे पंतप्रधान बोरिस जॉनसन यांनी असे म्हटले की, सरकार अशा आकडेवारीची वाट पाहत आहे जी नवा वेरियंट हा दुसऱ्या वेरियंटच्या तुलनेत किती अधिक पसरणारा आहे. तर ब्रिटिश आरोग्य मंत्रालयाने म्हटले, B1.617.2 वेरियंट उत्तर पश्चिम इंग्लंड आणि लंडन मध्ये पसरत चालला आहे. याच दरम्यान ब्रिटेनने आता कोविशिल्डच्या दोन्ही डोस देण्यामधील कालावधी कमी केला आहे. आता दोन्ही डोसच्या मध्ये 8 आठवड्यांचा कालावधी ठेवला आहे. दरम्यान, हा नियम 50 वर्षांहून अधिक वय असलेल्या लोकांसाठी लागू करण्यात आला आहे. यापूर्वी दोन्ही डोसच्या मधील कालावधी हा 12 आठवड्यांचा होता. बोरिस यांनी पुढे असे म्हटले की, हा नवा वेरियंट आपल्या प्रगतीसाठी बाधा ठरु शकतो. आम्ही लोकांना सुरक्षित ठेवण्यासाठी जे काही शक्य होईल ते करु.