UAE मध्ये आता पर्यटकांना मिळणार 5 वर्षांसाठी मल्टी एन्ट्री व्हिसा
Image used for representational purpose | (Photo Credits: PTI)

युनायटेड अरब एमरिट्स (United Arab Emirates)मधील दुबई, अबुधाबी मध्ये पर्यटनासाठी, शॉपिंग फेस्टिवल्सला जाण्यासाठी भारतीय पर्यटकांमध्ये विशेष क्रेझ आहे. आता युएईला भेट देणार्‍या पर्यटकांसाठी मोठा निर्णय युएई सरकारकडून घेण्यात आला आहे. आता भारतासह इतर देशातील नागरिकांना 5 वर्षांसाठी युएईचा मल्टी एन्ट्री व्हिझा (Multi-Entry Visa) मिळणार आहे. दरम्यान काल (6 जानेवारी) युएईचे पंतप्रधान मोहम्मद बिन राशिद अल मकतूम (Sheikh Mohammed bin Rashid Al Maktoum) यांनी हा निर्णय घेतला आहे.

युएईचे पंतप्रधान मोहम्मद बिन राशिद अल मकतूम यांनी ट्विटर अकाऊंटच्या माध्यमातून हा निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे आता पर्यटकांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे. मोहम्मद बिन राशिद अल मकतूम यांच्या माहितीनुसार, युएईमध्ये पर्यटन विकसित करण्यासाठी आता हा निर्णय घेण्यात आला आहे. 2020 च्या पहिल्या सहामाहीमध्ये व्हिसाशी निगडीत 2 महत्त्वाचे निर्णय राबवण्यात येणार आहेत. यामध्ये 5 वर्षांची मर्यादा वाढ सोबत मेक्सिकन नागरिकांना प्रवेश देण्याबाबतही नियम शिथील करण्यात येणार आहेत. UK Work Visa आता दोन वर्षांसाठी; भारतीय विद्यार्थ्यांसह परदेशी विद्यार्थांना मोठा दिलासा

युएई पंतप्रधानांंचे ट्वीट 

 

युएईमध्ये 2018 साली वर्षभरात 15.92 मिलियन पर्यटकांनी भेट दिली होती. तर 2017 च्या तुलनेत पर्यटकांमध्ये मागील वर्षी 0.8 % वाढ होणार आहे.