द्विमुखी साप आढळल्याने, नेटकऱ्यांची सोशल मीडियावर जोरदार चर्चा
द्विमुखी साप ( फोटो सौजन्य - Salato Wildlife Education Center)

आपण नेहमी सोशल मीडियावर कधी द्विमुखी साप प्रत्यक्षात पाहिला आहे का? विश्वास नाही ना पण हे खर आहे. न्यूयॉर्कमध्ये द्विमुखी साप आढळल्याची चमत्कारिक घटना घडली आहे.

सोशल मीडियावर आपण नेहमी पाच- सहा तोंडाचा अगडबम सापाचे फोटो आणि व्हिडिओ पाहतो. मात्र बारकाईने पाहिल्यानंतर त्यातील साप हा फोटोशॉप या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून तयार केलेला दिसून येतो. मात्र न्यूयॉर्कमधील केनटकी भागात राहणाऱ्या एका प्रेमी युगलुकाच्या घरात द्विमुखी साप असल्याचे कळले आहे. तसेच या सापाला वाईल्ड लाईफ सेंटरमध्ये नागरिकांना दाखवण्यासाठी ठेवण्यात येणार आहे.

तर न्यूयॉर्कमधील सॅलेटो वाईल्ड लाईफ सेंटरने या द्विमुखी सापाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले आहेत. त्यामुळे नेटकऱ्यांमध्ये या सापाला प्रत्यक्षात पाहण्याची उत्सुकता वाढली आहे. तसेच या द्विमुखी सापाचे डोके, डोळे आणि जीभ व्यवस्थित हालचाल करु शकतात असं या सॅलेटो वाईल्ड लाईफ सेंटरने सांगितले आहे.