Harvard University । X

अमेरिकेमध्ये ट्रम्प प्रशासनाने आता हार्वर्ड विद्यापीठामध्ये (Harvard University) आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांची नोंदणी करण्यास बंदी घातली आहे. गृह सुरक्षा विभागाकडून विद्यापीठाची सुरू असलेली चौकशी म्हणून ते असे करणार असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे. गृह सुरक्षा सचिव क्रिस्टी नोएम (Kristi Noem) यांनी विद्यापीठाला एक पत्र पाठवले आहे. अमेरिकेच्या गृह सुरक्षा विभागाने दिलेल्या निवेदनामध्ये, हावर्ड आता परदेशी विद्यार्थ्यांची नोंदणी करु शकत नसल्याचे आणि सध्या हार्वड मध्ये शिकत असलेल्या परदेशी विद्यार्थ्यांना  स्थानांतर करावे लागेल किंवा आपला कायदेशीर दर्जा गमवावा लागेल असं नमूद केलं आहे.

Kristi Noem यांनी X पोस्टमध्ये असेही म्हटले आहे की, "हे प्रशासन हार्वर्डला हिंसाचार, Anti-Semitic sentiments ना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांच्या कॅम्पसमध्ये चिनी कम्युनिस्ट पक्षाशी समन्वय साधण्यासाठी जबाबदार धरत आहे", आणि विद्यापीठात परदेशी विद्यार्थ्यांना प्रवेश देणे हा "विशेषाधिकार आहे, अधिकार नाही" असे म्हटले आहे.परदेशी विद्यार्थ्यांकडून मिळणारे जास्त शिक्षण शुल्क "त्यांच्या अब्जावधी डॉलर्सच्या देणग्या भरण्यास मदत करते".

अमेरिकेच्या गृह सुरक्षा विभागाचे निवेदन 

हार्वर्ड विद्यापीठाला पाठवलेल्या पत्रात असे नमूद करण्यात आले आहे की, जर हार्वर्डला येत्या शैक्षणिक वर्षाच्या आधी विद्यार्थी आणि Exchange Visitor Program certification परत मिळवण्याची संधी हवी असेल, तर त्यांनी "72 तासांच्या आत आवश्यक माहिती" द्यावी. नक्की वाचा: Harvard University protester: पॅलेस्टाईन समर्थकांनी हार्वर्ड विद्यापीठात अमेरिकन ध्वजाच्या जागी पॅलेस्टिनी ध्वज उभारला, आत्तापर्यंत 900 जणांना अटक.

ट्रम्प प्रशासनाच्या या निर्णयामुळे विद्यमान विद्यार्थ्यांना इतर शाळांमध्ये स्थानांतरित करण्यास भाग पाडले जाईल किंवा त्यांचा कायदेशीर दर्जा गमावावा लागेल, असे गृह सुरक्षा विभागाने म्हटले आहे.

विद्यापीठाच्या आकडेवारीनुसार, हार्वर्डने 2024-25 शैक्षणिक वर्षात जवळपास 6800 आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांची नोंदणी केली, जी एकूण नोंदणीच्या 27% आहे. यामध्ये भारताचे दरवर्षी 500-800 विद्यार्थी असल्याचं सांगितलं जात आहे.