Corona Vaccine: अमेरिकेत 12 ते 15 वर्षाच्या मुलांनाही मिळणार कोरोना लस; Pfizer लसीच्या वापरसाठी मिळाली परवानगी
Pfizer (PC - Facebook)

Corona Vaccine: जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातलं आहे. या साथीने सर्वाधिक त्रस्त असलेल्या अमेरिकेने कोरोनाविरूद्धच्या युद्धात आणखी एक मोठे पाऊल पुढे टाकले आहे. अमेरिकेच्या Food and Drug Administration (FDA) ने 12 ते 15 वर्षे वयोगटातील मुलांसाठी आपत्कालीन वापरासाठी फायझर कोरोना लसीस मंजूरी दिली आहे.

अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासनाने 12 ते 15 वर्षे वयोगटातील पौगंडावस्थेत फायझर-बायोटेकच्या कोविड -19 लसच्या तातडीच्या वापरास मान्यता दिली आहे. एफडीएचे कार्यकारी आयुक्त डॉ. जेनेट वुडकॉक म्हणाले की, कोविड लस वापरण्याच्या निर्णयामुळे आम्हाला पुन्हा सर्वसाधारण स्थितीत परतण्यास मदत होईल. (वाचा - रशियाच्या Sputnik Light लसीचा सिंगल डोस Coronavirus च्या सर्व स्ट्रेन्सवर परिणामकारक- RDIF)

अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) यापूर्वी 16 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त वयाच्या लोकांसाठी फायझर लस देण्यास मंजुरी दिली होती. तथापि, फायझर कंपनीला आढळले की, त्याची लस लहान मुलांवर चांगली काम करते, ज्याची घोषणा एका महिन्यानंतर करण्यात आली. फायझरची दोन डोस लस आता 12 ते 15 वर्षे वयोगटातील आपत्कालीन परिस्थितीत वापरण्यासाठी मंजूर दिली आहे.

भारतातील कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या तिसऱ्या लाटेचा इशारा दिल्यानंतर त्यावर सामोरे जाण्यासाठी तयारी सुरू झाली आहे. तज्ञांच्या मते, भारतातील कोरोनाच्या तिसर्‍या लाटेदरम्यान मुलांना सर्वाधिक संसर्ग होणार आहे. अशा परिस्थितीत एफडीएने उचललेले पाऊल खूप महत्वाचे आहे.