India-Pakistan Trade: इमरान खान सरकारचा यु-टर्न, भारतातून साखर आणि कापूस पाकिस्तान खरेदी करणार नाही- रिपोर्ट्स
Pakistan PM Imran Khan (Photo Credits: IANS)

India-Pakistan Trade: पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांच्या सरकारने पुन्हा एकदा यु-टर्न घेतला आहे. कारण पाकिस्तानने भारतातून साखर आणि कापूस खरेदी संदर्भातील जो निर्णय घेतला होता तो आता त्यांनी मागे घेतला आहे. तर ANI यांनी पाकिस्तानातील मीडियाच्या हवाल्याने असे म्हटले आहे की, आर्थिक समन्वय समिती (Economic Coordination Committee) चा तो प्रस्ताव फेडरल कॅबिनेट (Federal Cabinet) ने फेटाळून लावला आहे. ज्यामध्ये भारतातून साखर आणि कापसाची आयात करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

रिपोर्ट्सनुसार, आर्थिक समन्वय सिमितीद्वारे शेजारील देश भारतातून कापूस आणि साखरेच्या आयातीसाठी हिरवा झेंडा दाखवला गेला. मात्र एका दिवसानंतर आता लगेच हा निर्णय बदलण्यात आला आहे. खरंतर पाकिस्तानने 2019 मध्ये कश्मीर मध्ये तणाव वाढल्याने शेजारील देशाने आयातीवर बंदी घातली होती.(अमेरिकेमध्ये Vivek Murthy या Indian-American डॉक्टरांची Surgeon General म्हणून नियुक्ती)

Tweet: 

खरंतर भारत आणि पाकिस्तान दरम्यान, द्वीपक्षीय व्यापार संबंध 5 ऑगस्ट 2019  नंतर निलंबित केला गेला होता. भारत जम्मू कश्मीरला दिल्या गेलेल्या विशेष राज्याचा दर्जा काढून घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर दोन्ही देशांमध्ये व्यापार बंद झाला होता.