युरोपामध्ये कोरोना वायरस फैलावाची दुसरी लाट आहे आणि ती पहिल्य लाटेच्या तुलनेत अधिक तीव्र झाली आहे. Jerome Salomon, या फ्रान्सच्या director for public health यांनी दिलेल्या माहितीनुसार, देशातील वाढती कोरोनाबाधितांची संख्या चिंताजनक आहे. आठवडाभरातच रूग्णसंख्या दुप्पट झाली आहे. स्थानिक मीडियाशी बोलताना त्यांनी फ्रांसमध्ये कोरोनाचा फैलाव पुन्हा वाढल्याची भीती व्यक्त करत आहे. Emmanuel Macron, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष कोरोनाच्या विळख्यात; COVID 19 ची लागण झाल्याने सेल्फ आयसोलेट.
फ्रांसमध्ये मागील 24 तासांत 18, 254 नवे कोरोनाबाधित रूग्ण आढळले आहेत. तर मागील आठवड्यापासून सातत्याने हा आकडा दिवसाला 10 हजारांपेक्षा अधिक आहे. कालपर्यंत रूग्णालयात भरती असलेल्यांचा आकडा 25 हजारांपेक्षा जास्त आहे. तर 2800 च्या आसपास रूग्ण आयसीयू मध्ये आहेत. मार्च महिन्यापासून 60 हजारांपेक्षा अधिक रूग्णांचा मृत्यू झाला आहे. मागील मंगळवार पासूनच फ्रांसमध्ये लॉकडाऊन शिथिल करत नाईट कर्फ्यू लागू करण्यात आला आहे.
दरम्यान युरोपात अनेक ठिकाणी कोरोनाची दुसरी लाट आहे. ब्रिटन, जर्मनीमध्ये लॉकडाऊनचे नियम कडक करण्यात आले आहेत. यामध्ये आता फ्रांसमधील परिस्थिती देखील बिकट झाल्याचं चित्र आहे. पाश्चिमात्य देशात सध्या ख्रिसमसची धूम आहे पण या सेलिब्रेशनवर कोरोनाचं गडद संकट पहायला मिळत आहे.