The boy born with a TAIL: ब्राझीलमध्ये जन्मले शेपटीवाले बाळ, डॉक्टर्स आश्चर्यचकीत
Baby | Image Used For Representative Purpose | (Photo Credits: unsplash.com)

ब्राझीलमध्ये (Brazil) जन्माला आलेले एक बाळ पाहून डॉक्टरांनाही आश्चर्यचकीत झाले आहेत. हे बाळ चक्क शेपटी (Tail) धारी आहे. होय, या बाळाला जन्मत:च शेपूट आहे. या शेपटीची लांबी 4 इंच आहे. जगभरामध्ये कधी कधी आश्चर्यकारक गोष्टी घडतात. कधी हा निसर्गाचा चमत्कार मानला जातो. कधी विज्ञान सांगते काही दुर्मिळ घटनांमध्ये अशा प्रकारची बाळं जन्माला येऊ शकतात. कारण काही असले तरी, या बाळाणे मात्र सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांनीही याची दखल घेत याबाबत वृत्त दिले आहे.

आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, या मुलाला पाहून डॉक्टर्सही (Doctors) आश्चर्चचकीत झाले. हे बाळ 'मानवी शेपटी' (Human Tail) घेऊन जन्माला आले. बाळाच्या शेपटीचे शेवटचे टोक हे एखाद्या चेंडूसारखे लागत होते. जर्नल ऑफ पीडियाट्रिक सर्जरी केस रिपोर्ट्समध्ये बाळाच्या जन्म आणि त्याच्यावर करण्यात आलेल्या शेपटी काढण्याच्या शस्त्रक्रियेचे चित्रिकरण करण्यात आले. हे संपूर्ण प्रकरण ब्राझीलच्या अल्बर्ट साबिन चिल्ड्रन हॉस्पिटलमधील आहे. (हेही वाचा, World Mental Health Day 2021: मुलांच्या मानसिक वाढ, विकासासाठी आहारातील हे Foods ठरतील प्रभावी, घ्या जाणून)

दरम्यान, डॉक्टरांच्या एका टीमने ऑपरेशन करुन बाळाची शेपटी काढून टाकली आहे. डॉक्टर्सनी म्हटले की, बाळाची शेपटी चार इंचापर्यंत वाढली होती. शेपटीमध्ये कॉर्टिलेज आणि हडांचा कोणताही भाग मिळाला नाही. आतापर्यंत विना हडांची शेपटी असलेली बालके जन्मन्याच्या घटना अगदीच कमी घडल्या आहेत. अशा या दुर्मिळ प्रकरणाबाबत बोलताना डॉक्टरांनी सांगितले की, गर्भात असतानाच या बाळाची शेपटी वाढत असते. मात्र, हळूहळू हा गर्भ जसा वाढतो तसतशी ही शेपटी शरीरात लूप्त होते आणि शरीर सामान्य दिसू लागते. शक्यतो शेपटी कधीच शरीराबाहेर दिसत नाही. मात्र काही प्रकरणांमध्ये अशा घटना पाहायला मिळतात.

अल्ट्रासाऊंड स्कॅन केल्यानंतर डॉक्टर्सनी म्हटले की, या बाळाची शेपटी तांत्रिकदृष्ट्या त्याच्याशी जोडली गेली नव्हती. त्यामुळे ही ऑपरेशनमुळे हटवता येण्यासारखी होती. हे बाळ निश्चित समयसीमेपूर्वी (प्रिमॅच्यूअर) जन्माला आला होता. या आधीही जगभरात अशा अनेक बाळांचा जन्म झाला आहे.