World Mental Health Day 2021: मुलांच्या मानसिक वाढ, विकासासाठी आहारातील हे Foods ठरतील प्रभावी, घ्या जाणून
Health Foods For Mental Health | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com)

World Mental Health Day 2021: सदृढ आणि निकोप मानसिक वाढ, विकासासाठी मुलांच्या बालपणीच काळजी घेणे आवश्यक असते. त्यासाठी आहारात योग्य अन्नपदार्थ पुरेशा प्रमाणात असतील याबाबत काळजी घेणे महत्त्वाचे. त्यामुळे आहारतज्ज्ञ सांगतात की योग्य पोषणतत्व असलेले पदार्थ जर आहारात अंतर्भूत असतील तर मुलांच्या मानसिक विकासाला चालना मिळते. आज (10 ऑक्टोबर) जागतिक मानसिक आरोग्य दिन (World Mental Health Day 2021) आहे. त्यानिमत्त जाणून घेऊया असे कोणते अन्न अथवा अन्नपदार्थ (Foods) आहेत जे मुलांच्या मानसिक वाढ, विकासासाठी ठरतात प्रभावी.

अंडे (Eggs)

अंडे हा एक खूप प्रथिने (Protein) असलेले Food आहे. अंडे हा एक असा घटक आहे की ज्यात अधिक मात्रेत प्रोटीन आणि Cholesterol सुद्धा असते. अभ्याक सांगतात की बालकांच्या बुद्धीचा विकास होण्यासाठी अंड्यातील कोलीन नामक घटक अधिक महत्त्वाचा ठरतो. एका अंड्यात 125 मलीग्रॅम कोलीन असते. जे 4 ते 8 वर्षांच्या मुलांसाठी अधिक आवश्यक असते. (हेही वाचा, Chicken, Egg Price Hike: चिकन, अंडी दरात वाढ, खवय्यांच्या खिशाला भार; पाहा पर किलो कितीने वाढले दर)

पीनट बटर (Peanut Butter)

पीनट बटर हे शेंगदाण्यापासून बनवले जाते. शेंगदाण्यांमध्ये ई जीवनसत्व मोठ्या प्रमाणावर असते. तसेच एंटीऑक्सीडेंट सुद्धा भरपूर प्रमाणात असते. त्यातील थियामिन मानसिक आणि शारीरिक आरोग्यास उर्जा प्रदान करते. शरीराती उर्जेसाठी ग्लुकोज महत्त्वाचे असते जे थियामिनमधून मिळते. पीनट बटर आणि केळी यांचे सँडवीच, पीनट बटरसोबत सफरचंदाचे तुकडे, किंवा मुठभर शेंगदाण्यासोबत आपले आवडते सलाड आपण खाऊ शकता. ज्याचा चांगला फायदा होतो.

कडधान्ये (Whole Grains)

मेंदूच्या विकासासाठी ग्लुकोजची निरंतर आवश्यकता असते. जी कडधान्यातून पूर्ण होऊ शकते. शरीरातील ग्लुकोच प्रमाणात ठेवण्याचे काम फायबर करते. ज्यामुळे माणसाची स्मरणशक्ती मजबूत राहते. कडधान्यांमध्ये बी जिवनसत्व असते. जे शरीराला आवश्यक प्रमाणात पोषण देते.

ओट्स (Oats)

मुलांच्या बौद्धीक (मेंदू) विकासासाठी आवश्यक उर्जेची पुर्तता ओट्स चांगल्या प्रकारे मिळवून देऊ शकतात. सकाळी सकाळी आवश्यक असलेली उर्जा मुलांना ओड्सच्या माध्यमातून मिळू शकते. ओट्समध्ये फायबर मोठ्या प्रमाणावर असते. तसेच ई, बी जिवनसत्वासह, पोटेशिएम आणि जिंकही ओड्समधून चांगल्या प्रमाणात मिळतात.

बीन्स (Beans)

बीन्समध्ये विविध प्रकारच्या हिरव्या कडधान्यांचा समावेश होतो. ज्यात राजमा, छोले, चवळी आणि हिरव्या शेंगा आदींचा समावेश होतो. बीन्समध्ये प्रोटीन, अधिक प्रमाणात कार्ब्स आणि उर्जा असते. फायबरसोबत खूप सारी जिवनसत्वे आणि खनिजही असते. खास करुन दुपारच्या भोजनात बीन्सचे चांगले प्रमाण मुलांसाठी अधिक प्रभावी ठरु शकते.