आर्थिक लाभ मिळवण्याठी 66 वर्षीय मुलाने आईचा मृतदेह 1 वर्षापासून पुरला होता
Image Used for Representational Purpose Only. (Photo Credits: ANI)

ऑस्ट्रियातील (Austria) पोलिसांनी (Police) नुकतेच एका 66 वर्षीय व्यक्तीला अटक (Arrest) केली आहे. ज्याने त्याच्या आईचे शव (Deadbody) लपवून ठेवले होते. जेणेकरून तिचे फायदे त्या व्यक्तीला मिळत राहतील. एका पोस्टमनने लाभार्थीला भेटण्यास सांगितले तेव्हा ही घटना उघडकीस आली. जेव्हा मुलाने नकार दिला तेव्हा पोस्टमनने याची माहिती दिली. पोलिसांनी त्या व्यक्तीच्या घरी भेट दिली तेव्हा त्याच्या 80 वर्षांच्या आईचा मृतदेह सापडला. असे दिसून आले की या महिलेचा वर्षभरापूर्वी मृत्यू झाला होता. आरोपी त्याच्या आईसोबत ऑस्ट्रियामधील टायरॉल (Tyrol) प्रदेशातील इन्सब्रुकजवळ राहत होता. जेव्हा त्याची आई मरण पावली, तेव्हा त्याने तिचे शरीर तळघरात बर्फाच्या गोळ्यांनी गोठवले आणि नंतर मृतदेहाचे शवविच्छेदन केले. पोलिसांच्या अधिकाऱ्याने सांगितले की, 66 वर्षीय व्यक्तीने लाभ मिळवणे सुरू ठेवण्यासाठी तिचा मृतदेह ठेवला होता.

स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या या महिलेचा गेल्या वर्षी जूनमध्ये मृत्यू झाला. तिचा 66 वर्षांचा मुलगा ऑस्ट्रियाच्या टायरॉल प्रदेशात त्यांच्या राहत्या घरी मृतदेहासोबत राहत होता. चौकशी दरम्यान त्या व्यक्तीने कबूल केले की तिच्या मृत्यूनंतर, त्याने आईसपॅकने मृतदेह गोठवला. तसेच वास पसरू नये म्हणून तळघरात ठेवला होता.  द्रव बाहेर पडू नये म्हणून त्याने मृतदेह पट्ट्यांमध्ये गुंडाळला. त्याने पट्ट्यांनी मृतदेह झाकून त्याचे ममीकरण केले होते, असे पोलिसांनी सांगितले. आरोपीने त्याच्या भावाला सांगितले की त्यांची आई रुग्णालयात आहे. हेही वाचा Mumbai Rail Accident: पत्नीला भेटायला जाताना वेळ वाचावा म्हणून रेल्वे ट्रॅक ओलांडण्याचा शॉर्टकट घेतलेल्या तरूणाचा ट्रेनखाली येऊन मृत्यू; गोरेगावची घटना

नवीन पोस्टमनने मूळ लाभार्थी पाहण्यास सांगितले नाही तोपर्यंत तो दर महिन्याला पोस्टद्वारे त्याच्या आईचे लाभ घेत होता. मुलाने नकार दिल्यावर पोस्टमनला संशय आला आणि त्याने अधिकाऱ्यांना कळवले. पोलिसांनी घराला भेट दिली आणि 4 सप्टेंबर रोजी मृतदेह सापडला. शवविच्छेदन करण्यात आले ज्यामध्ये खुनाची शक्यता नाकारण्यात आली. मुलावर बेनिफिटसाठी फसवणूक केल्याचा आणि मृतदेह लपवल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या वर्षभरात त्याने आईचे शरीर लपवून 50,000 युरो किमतीचे फायदे मिळवले होते.

दरम्यान अशीच एक घटना कोलकाताच्या बेहाला भागात घडली होती. या घटनेत एका व्यक्तीने तीन वर्षांहून अधिक काळ आपल्या आईचा मृतदेह फ्रीजरमध्ये ठेवला होता.  सुरुवातीला, त्याने सांगितले की त्याला आपल्या आईला सोडायचे नाही. नंतर त्याने कबूल केले की तो बेरोजगार आहे आणि त्याच्या आईच्या पेन्शनवर टिकून आहे.