कोणत्याही जोडप्यासाठी, आई-बाप होणे ही आयुष्यातील एक मोठे सुख आहे. आई मुलाला जन्म देते, परंतु त्याला मोठे करण्यात वडिलांचे योगदान फार महत्वाचे ठरते. पहिल्यांदा आपल्या मुलाला कडेवर घेतल्याचा आनंद आई-वडील कधीच विसरू शकत नाहीत. प्रत्येक वडिलांची आपल्या मुलाने आपल्यापेक्षा उत्तम प्रगती करावी अशी इच्छा असते, मात्र अमेरिकेमधील (US) एका वडिलांनी मुलाने पहिले पाऊल टाकण्याआधीच त्याचा जीव घेतला आहे. या अमेरिकन वडिलांनी आपल्या पोटच्या मुलाची निर्घृण हत्या केली आहे, ज्याचे कारण अतिशय धक्कादायक आहे.
अमेरिकेच्या टेक्सासमध्ये (Texas) राहणाऱ्या एका 17 वर्षीय तरुणाने आपल्या 24 दिवसांच्या मुलाची हत्या केली आहे. न्यूज चॅनेल 8 च्या अहवालानुसार, 17 वर्षीय Caleb Blake Brown वर त्याचा मुलगा Emerson Ziesmer च्या हत्येचा आरोप आहे. पोलिसांनी माध्यमांना सांगितले की, या तरुणाला आपल्या मुलावर पैसे खर्च करायचे नव्हते किंवा त्याची कोणतीही जबाबदारी घ्यायची नव्हती. हा तरुण मुलाच्या जन्माने अजिबात खुश नव्हता. म्हणूनच संधी मिळताच त्याने आपल्या मुलाला ठार मारले.
डेली स्टारच्या अहवालानुसार ही बाब 9 ऑगस्टची आहे. मुलाची आई, Rachel Ziesmer कपडे बदलण्यासाठी बाथरूममध्ये गेली होते, त्याचवेळी हा मुलगा काही मिनिटांसाठी ब्राऊनसोबत एकटा होता. संधी मिळताच त्याने मुलाचे पोट जोराने दाबले आणि त्याला हवेत अनेक वेळा भिरकावण्यास सुरुवात केली. या दरम्यान मुलगा छताच्या पंख्यावरही आदळला आणि गंभीर जखमी झाला.
जेव्हा त्याची आई बाथरूममधून बाहेर आली, तेव्हा ब्राऊनने बाळाला ताबडतोब खाली ठेवले व तो निघून गेला. त्यानंतर 1 तासांनी बाळाचे शरीर हिरवे पडू लागले, त्याला घाम फुटू लागला. Rachelने तपासणी केली असता बाळाच्या पाठीला दुखापत झाली असल्याचे तिला आढळून आले. त्यांनतर ताबडतोब तिने ब्राउनला संपर्क केला व दोघे बाळाला घेऊन हॉस्पिटलमध्ये पोहोचले. मात्र त्यानंतर लगेच डॉक्टरांनी बाळाला मृत घोषित केले.
शवविच्छेदन अहवालात आढळून आले की, मुलाच्या बरगड्या आणि त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. त्यानंतर त्याच्या आईच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी ब्राऊनला अटक केली. ब्राऊनने आपला गुन्हा कबूल केला. (हेही वाचा: फ्रांसच्या चर्चमध्ये हजारो पाद्री आणि स्टाफकडून लहान मुलांवर लैंगिक अत्याचार; रिपोर्टमधून धक्कादायक खुलासा)
Rachel ने सांगितले की, ब्राऊन या मुलाच्या जन्माबाबत अजिबात खूश नव्हता. त्याची इच्छा होती की Rachel ने गर्भपात करावा, पण त्यास तिने नकार दिला. मुलाच्या जन्मानंतर तो त्याच्याशी अजिबात चांगला वागत नव्हता. आता कोर्टाने त्याला शिक्षा सुनावली आहे व 14 कोटी रुपयांच्या जामिनावर तुरुंगातून त्याची सुटका होऊ शकते.