Terrorist Attack On Pak Army: पाकिस्तानमध्ये लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, 6 जवान शहीद, 5 जखमी
Photo Credit -X

Terrorist Attack On Pak Army: पाकिस्तानमध्ये पुन्हा एकदा दहशतवादाची सावली(Terrorist Attack On Pak Army) दाट झाली आहे. लश्कर-ए-इस्लाम आणि तहरीक-ए-तालिबान या दहशतवादी संघटनांनी खैबर पख्तूनख्वा (Khyber Pakhtunkhwa)प्रांतातील तिराह खोऱ्यातील पाकिस्तानी लष्कराच्या आदम खेलच्या 93 एके चेक पोस्टवर (93K checkpost) हल्ला केला. या हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचे 6 जवान शहीद झाले असून 5 जवान जखमी झाले आहेत. (हेही वाचा:Pakistani Army Attack: पाकिस्तान लष्कर आणि पोलीस यांच्यात संघर्ष, पंजाब प्रांतातील चौकीवर हल्ला)

हा हल्ला मंगळवारी सकाळी झाला. दहशतवाद्यांनी अचानक चेकपोस्टवर हल्ला केला. चकमकीत प्रत्युत्तरामध्ये जवानांनी धाडस आणि शौर्याने दहशतवाद्यांचा मुकाबला केला. पाकिस्तानी लष्कराने या घटनेचा निषेध केला असून दहशतवादा विरोधातील लढा सुरू ठेवण्याची घोषणा केली आहे. ही घटना पाकिस्तानातील वाढत्या दहशतवादाचे आणखी एक उदाहरण आहे. देशातील दहशतवादाविरुद्धची लढाई अत्यंत कठीण असून दहशतवादी नव्या जोमाने सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे.