पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वा आणि बलुचिस्तान प्रांतात गेल्या दोन दिवसांत झालेल्या दहशतवादी घटनांमध्ये एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यासह सहा सुरक्षा कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. तसेच या हल्ल्यात 12 दहशतवादीही ठार झाले आहेत. पाकिस्तान सशस्त्र दलाची मीडिया शाखा इंटर सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्सने सांगितले की, बलुचिस्तान प्रांतात चार दहशतवादी मारले गेले आहेत. खैबर पख्तूनख्वामधील डेरा इस्माईल खान जिल्ह्यातील कुलाची तालुक्याच्या कोट सुलतान भागात सुरक्षा दलांनी केलेल्या कारवाईत आठ दहशतवादी मारले गेले. ठार झालेल्या दहशतवाद्यांकडून शस्त्रास्त्रे, दारूगोळा आणि स्फोटके जप्त करण्यात आली आहेत. (हेही वाचा - Man Chop His Wife Into Pieces: धक्कादायक! क्रूर पतीने पत्नीच्या मृतदेहाचे केले 200 हून अधिक तुकडे; गुगलवर शोधले पत्नीच्या हत्येचे फायदे)
खैबर पख्तुनख्वाच्या लक्की मारवत येथे शुक्रवारी रात्री झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पोलीस उपअधीक्षक आणि दोन पोलिस ठार झाले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. यावेळी एक हवालदारही जखमी झाला. खैबर पख्तुनख्वाच्या लक्की मारवत येथे शुक्रवारी रात्री झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पोलीस उपअधीक्षक आणि दोन पोलिस ठार झाले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. यावेळी एक हवालदारही जखमी झाला.
शनिवारी रात्री टँक जिल्ह्यातील मियाँ लाल पोलीस चौकीजवळ एका हवालदाराची अज्ञातांनी हत्या केली होती. लक्की मारवत येथे पोलिसांवर झालेल्या हल्ल्याचा पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी तीव्र शब्दात निषेध केला आहे.