मला फरारी का म्हणता? विजय मल्ल्याचा भाजपला सवाल
विजय मल्ल्या | (Photo Credits: PTI/File)

बँकांचे कर्ज बुडवून विदेशात फरार झालेल्या विजय मल्ल्या (Vijay Mallya) ह्याला फरार आरोपी म्हणून जाहीर करण्यात आले. मात्र आता मल्ल्या ह्याने भाजपला सवाल करत असे म्हटले आहे की, मला फरारी का म्हणता? 1992 पासून ब्रिटनमध्ये राहत असल्याचे सत्य आहे. परंतु भाजप पक्षाकडून मी भारतातून पळ काढला असल्याचे कोणत्या आधारावर म्हणत आहे असे मल्ल्याने विचारले आहे.

मल्ल्या ह्याने ट्वीट करत असे म्हटले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मी थकवलेली सर्व कर्ज परतफेड केल्याचे एका मुलाखतीत म्हटले होते. त्यामुळे असे असून सुद्धा भाजपमधील प्रवक्ते माझ्यावर टीका करत असल्याचा सवाल केला आहे. बँकांचे 9 हजार कोटी रुपये थकविले होते. मात्र मल्ल्या ह्याची 14 कोटी रुपयांच्या संपत्तीवर जप्ती आणली असल्याचे ही मोदी यांनी म्हटले आहे.(हेही वाचा-जेट एअरवेजला वाचवण्यासाठी माझेच पैसे घ्या- विजय मल्ल्या)

मोदी यांनी केलेल्या विधानांमुळे मी फक्त पोस्टर बॉय दिसून येत आहे. तर मल्ल्या ह्याच्याकडून प्रमाणापेक्षा जास्त रक्कम मंजूर करत असल्याची कबुली देताना मोदी विचलित झाले होते. त्यामुळे मी पोस्टर बॉय असून ते मला मान्य आहे. परंतु मोदी यांनी माझ्याबद्दल जे काही वक्तव्य केले त्याबद्दल मला सर्व ठाऊक असल्याचे मल्ल्या ह्याने म्हटले आहे.