जेट एअरवेजला वाचवण्यासाठी माझेच पैसे घ्या- विजय मल्ल्या
विजय माल्या Photo Credit-PTI)

जेट एअरवेज (Jet Airways) कंपनी सध्या डबघाईला जाऊन पोहचली असून त्यांच्या समोर आर्थिक संकट उभे राहिले आहे. त्यामुळे जेटला आर्थिक संकटामधून बाहेर काढण्यासाठी सर्व बँकांना हाक दिली असून 26 बँकांपैकी 2 बँका त्यांना मदत करण्यासाठी तयार झाल्या आहेत. मात्र बँकांचे कर्ज बुडवून विदेशात पसार झालेल्या विजय मल्ल्या (Vijay Mallya) ह्याने मला करण्यासाठी मोदी सरकार कधीच पुढे आले नसल्याची टीका केली आहे.

विजय मल्ल्या ह्याने ट्वीट करुन त्यामध्ये असे लिहिले आहे की, किंगफिशरला वाचवण्यासाठी गुंतवणुक केली. तसेच प्रयत्नही केले गेले परंतु माझ्या या प्रयत्नाकडे दुर्लक्ष करत माझ्यावर टीका करण्यात आली असल्याचे त्याने म्हटले आहे.

कंपनी आणि कर्मचाऱ्यांना वाचवण्यासाठी किंगफिशर एअरलाईन्सने 4000 कोटींची गुंतवणुक केली. मात्र त्याकडे लक्ष दिले नाही. तर सरकारी बँकांनी कोणत्याही पद्धतीने मदत करण्यास नकार दिल्याने कंपनी डबघाईला गेली असल्याचे ही मल्ल्या यांने ट्वीट मध्ये म्हटले आहे.

त्याचसोबत 2012 रोजी माझी एअरलाईन्स कंपनी बंद पडली. तरीही आता मी पुन्हा एकदा सांगतो की. कर्ज फेडण्यासाठी संपत्तीची माहिती कर्नाटक उच्च न्यायालयाला दिली असून माझे पैसे बँका घेत नाहीत. मात्र तुम्ही हेच पैसे उपयोगात आणणून जेट एअरवेजला वाचवू शकतात असे मल्ल्या यांनी मोदी सरकारला उद्देशून सांगितले आहे.