चक्रीवादळ (Photo Credits- IMD)

दुष्काळ आणि उष्णतेच्या लाटेने हैराण झालेल्या जपान (Japan) आणि चीनवर (China) आणखी एक मोठा संकट येणार आहे. या वर्षातील सर्वात शक्तिशाली समजले वादळ (Strongest Global Storm) सध्या पूर्व चीन समुद्र ओलांडून वेगाने पुढे सरकत आहे. 2022 च्या या धोकादायक वादळाला टायफून हिनानॉर (Typhoon Hinnamnor) असे नाव देण्यात आले आहे. हे वादळ जपानच्या दक्षिणेकडील बेटांसाठी धोक्याचे ठरण्याची शक्यता आहे. या वादळामुळे चीनच्या पूर्व किनाऱ्यावर अनियंत्रित वाऱ्याचा धोका वाढत आहे.

पश्चिम पॅसिफिक महासागरातून उठलेल्या या चक्रीवादळामुळे चीनच्या पूर्वेकडील किनारा, जपान आणि फिलिपाइन्सच्या दक्षिणेकडील किनारपट्टीवरील लोक आणि त्यांच्या उपजीविकेला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो. सध्या हे वादळ 241 किलोमीटर प्रती तास वेगाने पुढे जात आहे. त्याच वेळी, त्याच्या वाऱ्याचा वेग ताशी 184 मैलांपेक्षा जास्त आहे. JMA अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, हिनानॉर हे 2022 मधील सर्वात शक्तिशाली वादळ असेल.

अमेरिकेच्या संयुक्त टायफून चेतावणी केंद्राने म्हटले आहे की या चक्रीवादळातून समुद्रात उसळणाऱ्या लाटांची उंची कमाल 50 फुटांपर्यंत मोजली गेली आहे. ओकिनावाला जाणारी उड्डाणे आधीच वादळामुळे विस्कळीत झाली आहेत. जपान एअरलाइन्सने बुधवारी या प्रदेशात जाणारी आणि तेथून येणारी उड्डाणे रद्द केली, तर एएनए होल्डिंग्स इंक. ने सांगितले की गुरुवारपर्यंत आठ उड्डाणे रद्द करण्यात आली. दोन्ही कंपन्यांनी इशारा दिला की वादळाच्या काळात संपूर्ण आठवडाभर उड्डाणे प्रभावित होऊ शकतात. (हेही वाचा: पाकिस्तानात पाऊस आणि पुरामुळे हाहाकार, जवळजवळ 1000 जणांचा मृत्यू; देशात आणीबाणी जाहीर)

वादळ ओकिनावाच्या दक्षिणेकडे सरकत आहे, नंतर उत्तरेकडे आणि आठवड्याच्या शेवटी ते बेटाकडे सरकेल. त्यानंतरचा मार्ग अनिश्चित आहे, परंतु अंदाज दर्शवितो, की वादळ पुढील आठवड्यात कोरियन द्वीपकल्पाच्या दिशेने उत्तरेकडे चालू राहील. म्हणजेच तैवान आणि चीनच्या किनार्‍याला स्पर्श करून पुढे जाईल. दरम्यान, ऑगस्टमध्ये सात दशकांहून अधिक काळात केवळ दोनदा चक्रीवादळ आले आहे. पहिले वादळ 1961 मध्ये आणि दुसरे 1997 मध्ये आले होते, परंतु या दोन्ही वादळाचा वेग यंदाच्या वादळासारखा नव्हता.