Amazon Founder Jeff Bezos (Photo Credits: IANS)

अॅमेझॉनचे (Amazon) संस्थापक जेफ बेझोस (Jeff Bezos) यांनी अलीकडेच सीएनएन मुलाखतीत ग्राहक आणि व्यवसायांना एक मोठी चेतावणी. त्यांनी सांगितले की, आर्थिक मंदीचे सावट असल्याने येत्या काही महिन्यांत मोठी खरेदी पुढे ढकलण्याचा विचार करावा. अब्जाधीशाने अमेरिकन कुटुंबांना नवीन कार आणि टीव्ही खरेदी करू नयेत असे सांगितले आहे, कारण अमेरिका मंदीत आहे. देशातील घरगुती कर्ज $16.5 ट्रिलियन झाले आहे आणि अमेरिकन लोक त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी क्रेडिटवर अवलंबून आहेत.

मुलाखतीदरम्यान अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस म्हणाले की, माझा लोकांना सल्ला आहे की, काही जोखीम घ्या. तुम्ही खरेदीला जात असाल, तर कदाचित ती खरेदी थोडी कमी करा. ती रोकड तुमच्याकडे ठेवा, काय होते ते पहा व त्यानंतर निर्णय घ्या. नवीन ऑटोमोबाईल, रेफ्रिजरेटर किंवा अशा गोष्टींसाठीही ही गोष्ट लागू होते, असा सल्ला त्यांनी दिला. यासोबतच त्यांनी असेही म्हटले आहे की, सध्या अर्थव्यवस्था फारशी चांगली दिसत नाही. आर्थिक घडामोडी मंदावल्या आहेत. अर्थव्यवस्थेच्या अनेक क्षेत्रात तुम्ही कर्मचारी कपात पाहत आहात.

अॅमेझॉनचे माजी सीईओ यांनी लहान व्यवसाय मालकांना त्यांच्या रोख साठ्यात वाढ करण्याच्या बाजूने नवीन उपकरणे खरेदी करणे थांबवण्याचा सल्ला दिला. ब्लूमबर्ग अब्जाधीश निर्देशांकानुसार, जेफ बेझोस यांची एकूण संपत्ती $123.9 अब्ज आहे. अॅमेझॉनचे सीईओ अँडी जॅसी यांनी खुलासा केला आहे की कंपनी 2023 पर्यंत कर्मचार्‍यांना काढून टाकत राहणार आहे. कर्मचारी कपात प्रक्रिया या आठवड्याच्या सुरुवातीला सुरू झाली. कंपनीने घोषित केले की ते डिव्हाइसेस आणि पुस्तकांच्या व्यवसायातील कर्मचार्‍यांना काढून टाकत आहेत. (हेही वाचा: एलॉन मस्कचा ट्विटर सस्पेंडेड अकाउंटबाबत मोठा निर्णय! अमेरीकेचे माजी राष्ट्रध्यक्ष डोनाल्ट ट्रम्प ट्विटरवर कमबॅक तर कंगणाचं ट्विटर अकाउंटही..)

दरम्यान, जेफ बेझोस म्हणाले की, ते आपल्या $124 अब्ज डॉलर्सपैकी बहुतेक संपत्ती हवामान बदलाचा सामना करण्यासाठी आणि वाढत्या सामाजिक आणि राजकीय विभाजनांमध्ये मानवतेला एकत्र आणणाऱ्या लोकांना पाठिंबा देण्यासाठी दान करतील. Amazon.com Inc ही जगातील पहिली सार्वजनिक कंपनी बनली आहे ज्याचे बाजार मूल्यात $1 ट्रिलियन नुकसान झाले आहे.