सोशल मिडीया (Social Media) हा संपूर्ण जगात एक प्रभावी माध्यम बनला आहे. ट्विटरच्या (Twitter) नियमांचं उल्लंघन केल्यामुळे किंवा काही आक्षेपार्ह पोस्ट शेअर (Post Share) केल्याने गेले काही दिवसांपूर्वी अनेकांचे ट्विटर अकाउंट सस्पेंड (Twitter Account Supended) करण्यात आले. यांत सर्वसामान्यांसह अनेक दिग्दज कलाकार आणि जगप्रसिध्द राजकीय नेत्यांचा देखील समावेश होता. पण ट्विटरची सुत्र एलॉन मस्क (Elon Musk) यांच्या हाती आल्यानंतर ट्विटरचा सगळा कायापालटचं झाला आहे. ट्विटरचे नवे माल यांनी ट्विटरचं कामकाज, पॉलिसीज, कर्मचारी, प्रोटोकॉल (Protocal) यात 180 अंशाचा बदल केला आहे असं म्हणायला हरकत नाही. तरी आता एलॉन मस्क (Elon Musk) यांनी ट्विटरच्या सस्पेंडेड अकाउंटबाबत मोठा निर्णय घेतला आहे. यानंतर अमेरीकेचे माजी राष्ट्रध्यक्ष डोनाल्ट ट्रम्प (Donalt Trump) यांचं अकाउंट पुन्हा दुसू लागलयं. तरी ट्रम्प यांनी पुन्हा एकदा ट्विटरवर कमबॅक केल असल्यानं आता इतर सस्पेंडेड अकाउंटबाबत ही चर्चांना उधाण आलं आहे.
बॉलिवुड अभिनेत्री कंगणा रनौत (Kangana Ranut) हिने देखील बंगाल हिंसाचाराबाबत काही आक्षेपार्ह ट्विट केल्या प्रकरणी कंगणाचे ट्विटर अकाउंट (Twitter Account) सस्पेंड करण्यात आले होते. पण आता डोनाल्ट ट्रम्पच्या ट्विटर (Donalt Trump) वापसी नंतर अत्रिनेत्री कंगणा रनौतचं देखील ट्विटर अकाउंट पुन्हा सुरु केल्या जाणार का याबाबत सोशल मिडीयावर (Social Media) चर्चा रंगल्या आहेत. तसेच बॉलिवूड (Bollywood) मधील विविध कलाकारांचे ट्विटर अकाउंट सस्पेंड करण्यात आले होते. (हे ही वाचा:- Download Twitter Archive: ट्विटर होणार बंद ? अशा प्रकारे तुम्ही तुमच्या जुन्या ट्विट आणि प्रोफाइल डेटाचा बॅकअप करू शकता डाउनलोड)
#UPDATE Donald Trump's once-blocked Twitter account reappeared on the platform Saturday, minutes after company owner Elon Musk announced he was lifting the 22-month suspension on the former president over incitement of violence.
— AFP News Agency (@AFP) November 20, 2022
#BREAKING Trump account reappears on Twitter after Musk reinstatement
— AFP News Agency (@AFP) November 20, 2022
कमाल आर खान, गायक अभिजीत भट्टाचार्य, टीव्ही अभिनेत्री पायल रोहतगी, अभिनेता सुशांत सिह आणि कंगना रनौतची बहिण रंगोली हिचे देखील ट्विटर अकाउंट सस्पेंड करण्यात आले होते. तरी याबाबत आता ऐलॉन मस्क काय निर्णय घेणार यावर सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.