श्रीलंका संसद हाणामारी ( फोटो सौजन्य- ट्विटर )

श्रीलंकेमध्ये राजकीय पक्षांमधील विवादाने राजकरणावर मोठा परिणाम होताना दिसून येत आहे. या प्रकरणी राजकीय वातावरण तापलेले असून गुरुवारी भरलेल्या संसदेतच राजपक्षे समर्थक आणि विरोधक खासदार यांच्यामध्ये वाद होऊन या दोघांनी संसदेत एकमेकांना चोपल्याचा प्रकार घडला आहे.

राजपक्षे सरकारविरोधात बुधवारी श्रीलंकेच्या संसदेच अविश्वास प्रस्तावाला मंजूरी दिल्यानंतर या दोन गटात जोरात हाणामारी झाली आहे. तसेच संसदेचे कामकाज चालू झाल्यानंतर अध्यक्ष कारु जयसुर्या यांनी देशात सरकार अस्तित्वात नसल्याने कोणीही पंतप्रधान नाही असे घोषित केले. या कारणावरुन राजकीय पक्षांमधील वाद अजूनच चिघळला. त्यामुळे राजपक्षे यांचे समर्थक व खासदार सभागृहाच्या मध्यभागी आले. तसेच काही खासदारांनी पाण्याचा बॉटल्स, पुस्तके अध्यक्षकांच्या दिशेने फेकून दिल्याचा प्रकार घडला आहे.

राजपक्षे यांना विरोध करणारे खासदार जयसूर्या यांना संरक्षण देण्यासाठी त्यांच्याभोवती जमले होते. त्यानंतर परिस्थिती आवाक्याबाहेर जात असल्याने जयसूर्या यांनी संसदेचे कामकाज तेथेच थांबविले.