Sri Lanka: कोरोनाविरुद्ध 'जादुई औषध' बनवल्याचा स्वयंघोषित बाबाचा दावा; Miracle Potion चे सेवन केल्यानंतर मंत्र्यांना कोरोना विषाणूची लागण 
Coronavirus | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com)

एकीकडे वैज्ञानिक आणि आरोग्य तज्ञ प्राणघातक कोरोना व्हायरस (Coronavirus) विरूद्ध लस तयार करण्यात व्यस्त आहेत, तर दुसरीकडे श्रीलंकेतील (Sri Lanka) स्वयंघोषित बाबाने कोरोनावरील औषध शोधले असल्याचा दावा केला आहे. श्रीलंकेचे महिला आणि बालविकास मंत्री, पियाल निशांथ डे सिल्वा (Piyal Nishantha de Silva) यांनी या माणसावर विश्वास ठेवला आणि धम्मिका बंडाराने बनवलेल्या औषधाचा डोस घेण्याचे ठरविले. मात्र हा दावा खोटा असल्याचे तेव्हा सिद्ध झाले जेव्हा मंत्र्यांनी हे जादुई औषध (Miracle Potion) घेतले व त्यांना ताबडतोब रुग्णालयात न्यावे लागले. तिथे गेल्यानंतर त्यांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचे आढळून आले.

फक्त सिल्वाच नाही तर हे औषध घेतल्यानंतर दुसर्‍या नेत्याच्या कुटूंतील सदस्यांनाही कोरोना विषाणूची लागण झाल्याचे आढळले आहे. बंडाराने दावा केला होता की या सिरपचा फॉर्म्युला त्याला  हिंदू देवी कालीपासून मिळाला आहे. त्यानंतर त्याने स्वतः मध आणि जायफळ त्यामध्ये घातले. या प्रकारानंतर श्रीलंकेच्या सरकारने स्वयंघोषित धार्मिक नेत्याशी आपले संबंध तोडण्याचा प्रयत्न केला आहे. मास मीडिया मंत्री Keheliya Rambukwella म्हणाले, ‘काही खासदारांनी स्वतःहून औषध घेतले आहे, सरकार त्यास समर्थन देत नाही.’ (हेही वाचा: Sinopharm Vaccine: पाकिस्तानने दिली चीनची कोरोना विषाणू लस 'सिनोफार्म'ला मंजुरी; Most Unsafe सह 73 दुष्परिणाम दिसल्याचा केला आहे दावा)

गेल्या महिन्यात, हजारो लोक सामाजिक अंतराचे नियम डावलून, सरकारने लादलेल इतर कोरोना नियम तोडून हे विषाणू विरूद्धचे जादुई औषध घेण्यासाठी बंडारा गावात पोहोचले होते. दरम्यान, मंगळवारी भारताने सहा देशांना कोरोना लस देण्याची घोषणा केली. कोविड-19 साथीच्या रोगाचा मुकाबला करण्यासाठी भूटान, मालदीव, बांगलादेश, नेपाळ, म्यानमार आणि सेशल्सला बुधवारपासून मदत सामग्री म्हणून कोरोना विषाणू लस उपलब्ध करुन दिली जाईल. तसेच श्रीलंका, अफगाणिस्तान आणि मॉरिशस येथे आवश्यक नियामक मान्यता घेऊन लसीची शिपमेंट पाठविली जाईल.