Image used for representational purpose only | (Photo Credits: Pixabay)

दक्षिण आफ्रिकेच्या (South Africa) जोहान्सबर्गजवळील (Johannesburg) सोवेटो टाऊनशिपमधील (Soweto township) एका बारमध्ये झालेल्या गोळीबारात चौदा जणांचा मृत्यू झाला आहे. रात्री 12:30 च्या सुमारास गोळीबारा संबंधीत माहिती पोलिसांना  मिळाली. पोलिस घटनास्थळी पोचल्यावर गोळीबारात 12 जणांचा जागीच मृत्यू झाल्याचं निदर्शनास आलं. तसेच या गोळीबारात 11 जण गंभीर जखमी असुन त्यापैकी दोघांचा मृत्यू झाला आहे. म्हणजेच आता एकूण मृतकांची संख्या 14 असुन 9 जण गंभीर जखमी आहेत.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मिनी बसमधून अचानक बारमध्ये काही लोक आलीत आणि बाराच्या दारावर असलेल्या सुरक्षारक्षकांवर गोळीबार करण्यास सुरुवात केली. नंतर ही लोक आत शिरत बारमधील आतील लोकांवरही गोळीबार केला. या सामुहिक गोळीबाराचं कारण अद्यापही कळू शकलं नाही तरी संबंधीत प्रकारणाचा पोलिस (Police) शोध घेत आहेत. घटना स्थळाची पाहणी केली असता या गोळीबारात गॅगचा समावेश असल्याचं कळतयं.  घटनेत गंभीर जखमी झालेल्यावर सध्या क्रिस हानी बरगवनाथ (Chris Hani Baragwanath Hospital)या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.  (हे ही वाचा:-Gotabaya Rajapaksa : दस्तूर खुद्द देशाचे राष्ट्रपती गेले पळून, जाणून घ्या का आली राष्ट्रपतींवर पळून जाण्याची वेळ)

 

 

दक्षिण आफ्रिकेत घडलेली ही घटना अत्यंत गंभीर आहे. आंतरराष्ट्रीय (International) स्तरावर या घटनेसंबंधी शोक व्यक्त केला जात आहे. तरी घडलेल्या या प्रकाराच्या मागे नेमक कोण आहे या संबंधीत तपास करणं हे दक्षिण आफ्रिकेतील पोलिसांसाठी आव्हानातमक असणार आहे. घडलेल्या संपूर्ण प्रकाराची माहिती पुलिस आयुक्त लेफ्टिनेंट जनरल इलियास मावेला यांनी असोसिएट प्रेसला (Associate Press) दिली आहे.