SLRC: श्रीलंकेच्या सरकारी वृत्तवाहिनीवर आंदोलकांचा कब्जा, नागरिकच करु लागले अँकरींग; प्रसारण बंद
SLRC | (Photo Credit - Twitter)

राष्ट्राध्यक्ष गोटाबाय राजपक्षे (Gotabaya Rajapaksa) यांनी देशातून बळ काढल्यानंतर श्रीलंकेमध्ये (Sri Lanka) अराजक निर्माण झाले आहे. देशातील नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. त्यामुळे नागरिक आंदोलन करत आहेत. आंदोलनाला दिशाहीन स्वरुप प्राप्त झाले आहे. आंदोलक वाट्टेल त्या गोष्टी करु लागले आहेत. आंदोलकांनी राष्ट्राध्यक्षांच्या सरकारी निवासस्थानत कब्जा मिळवल्यानंतर आता श्रीलंकेच्या सरकारी वृत्तवाहिन्यांवरही कब्जा मिळवला आहे. प्रसारमाध्यमांतून आलेले वृत्तानुसार, एक आंदोलक तर श्रीलंका रुपावाहिनी कॉर्पोरेशन (Sri Lanka Rupavahini Corporation) या सरकारी प्रसारमाध्यम असलेल्या कार्यालयात जाऊन थेट न्यूज अँकरच्या खुर्चीतच जाऊन बसला. तो इतक्यावरच थांबला नाही तर त्याने आपल्या हटके स्टाईलमध्ये बातम्या द्यायलाही सुरुवात केली. आंदोलकांच्या या पवित्र्यामुळे एसएलआरसी (SLRC) व्यवस्थापनाला प्रसारण काही काळ थांबवावे लागले.

श्रीलंकेत आज सलग चौथ्या दिवशी पुन्हा एकदा आंदोलक आक्रमक झाले आहेत. राष्ट्रपती गोटाबाय यांनी देश सोडून मालदीवला पलायन केले आहे. त्यामुळे श्रीलंकेतील जनता रस्त्यावर उतरली आहे. संसद भवन आणि पंतप्रधानांच्या निवासस्थानी घुसून आंदोलकांनी धुडगुस घालायला सुरुवात केली आहे. या आंदोलकांना पोलिसांनी रोखण्याचा प्रयत्न केला तेव्हा आंदोलक अधिकच आक्रमक झाले. पोलिसांनी आंदोलकांना पांगविण्यासाठी बंदुकीचे हवेत 10-12 राऊंडही फायर केले. परंतू, त्याचाही काही परिणाम झाला नाही. (हेही वाचा, Sri Lanka Crisis: श्रीलंकेच्या आर्थिक संकटात भारताचा पांठिबा, 3.8 अब्ज अमेरिकन डॉलर्सची केला अभूतपूर्व मदत)

ट्विट

ट्विट

ट्विट

ट्विट

श्रीलंकेचे राष्ट्रपती गोटाबाय राजपक्षे यांनी रात्री उशीरा देश सोडला आहे. ते सैनिकी विमानातून मालदीवला पोहोचले. ते आपली पत्नी आणि इतर खास 10 लोकांना सोबत घेऊन मालदिवला पोहोचले. सांगितले जात आहे की, राजपक्षे दुबईला जाऊ शकतात. गोटाबाय यांनी आतापर्यंत राष्ट्रपती पदाचा राजीनामा दिला नाही. सांगितले जात आहे की, दुबईमार्गे ते आपल्याला हव्या त्या ठिकाणी जातील आणि तिथे पोहोचल्यावर राजीनामा देतील.