धक्कादायक! 18 वर्षांच्या दोन जुळ्या बहिणींची गोळी घालून निर्घृण हत्या; इन्स्टाग्रामवर केले हत्याकांडाचे Live Telecast
Murder | (Photo Credits: PixaBay)

ब्राझीलमधून (Brazil) एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. इथे 18 वर्षांच्या दोन जुळ्या बहिणींची निर्घृण हत्या करण्यात आली. इतकेच नाहीतर या हत्याकांडाचे थेट प्रक्षेपणही करण्यात आले. मारेकऱ्यांनी ही घटना इन्स्टाग्रामवर लाईव्ह दाखवली. या घटनेनंतर करण्यात आलेल्या कारवाईमध्ये पोलिसांनी एका अल्पवयीन तरुणाला अटक केली आहे. या हत्येमागे अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या टोळीचा हात असल्याचे असल्याचे सांगितले जात आहे. 'द सन' मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, ब्राझीलच्या पकाजास (Pacajus) येथे राहणाऱ्या 18 वर्षीय विवाहित जुळ्या बहिणी अमलिया आणि अमांडा अल्वेस यांची रस्त्याच्या कडेला गोळ्या घालून हत्या करण्यात आली.

हल्लेखोरांनी दोन्ही बहिणींना त्यांच्या घराबाहेर नेले आणि नंतर थोड्या अंतरावर त्यांना ठार मारण्यात आले. मारेकऱ्यांनी ही संपूर्ण घटना इन्स्टाग्रामवर लाईव्ह दाखवली. अमांडाला तीन वर्षांची मुलगी आहे तर अमलिया नुकतीच आई बनली आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण आहे. त्याचवेळी, पोलिसांनी या संदर्भात 17 वर्षीय तरुणाला अटक केली आहे. पोलिसांनी सांगितले की, हल्लेखोरांनी दोन्ही बहिणींना त्यांच्या घराबाहेर काढले आणि जवळच्या रस्त्यावर जमिनीवर बसवून मागून गोळी झाडली. (हेही वाचा: Sex In Car: धक्कादायक! कारमध्ये सेक्स करणे जीवावर बेतले; लैंगिक संबंध ठेवताना 15 वर्षांच्या मुलीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यु)

पोलिसांनी हत्येमागील कारण उघड केले नाही, परंतु स्थानिक लोक याचा संबंध ड्रग्जशी जोडत आहेत. त्यांनी सांगितले की, या दोन्ही बहिणींना तस्करांबद्दल खूप माहिती होती. स्थानिक वृत्तपत्र Jornal de Brasília च्या बातमीनुसार, अमलिया आणि अमांडा अल्वेस यांना स्थानिक ड्रग्ज पुरवणाऱ्या लोकांबद्दल खडानखडा माहिती होती, की त्यांच्या जीवावर बेतली. पोलिसांनी अटक केलेल्या अल्पवयीन मुलाला यापूर्वी अनेक वेळा अटक करण्यात आली आहे.