
ब्राझीलच्या साओ पाउलोमध्ये (Sao Paulo) एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे, जिथे एका 15 वर्षीय मुलीचा कारमध्ये सेक्स करताना हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झालाआहे. पोलिसांनी म्हटले आहे की, त्या मुलीच्या शरीरावर कोणत्याही हिंसाचाराची चिन्हे नाहीत, हा गुन्हा संशयास्पद मृत्यू म्हणून नोंदवला गेला असून त्याची गंभीरपणे चौकशी केली जात आहे. डेली मेलच्या अहवालानुसार पोलिसांचे म्हणणे आहे की साओ पाउलो येथील 15 वर्षीय मुलीचा 26 वर्षीय पुरुषासोबत सेक्स करताना हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.
26 वर्षीय तरुणाने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, तो या मुलीसोबत तिच्या कारमध्ये शारीरिक संबंध ठेवत असता अचानक ही मुलगी बेशुद्ध पडली. नंतर तिला क्युबाटाओ,सो पाउलो येथील यूपीए जार्डिम वैद्यकीय सुविधेत दाखल करण्यात आले, जिथे तिचा मृत्यू झाला. त्याने पुढे असेही सांगितले की, या दरम्यान, मुलीचे ओठ आणि त्वचा पिवळी पडली होती आणि तिचे हात मागे वळले होते. तिला बेशुद्ध अवस्थेत रुग्णालयात नेण्यात आले, जिथे डॉक्टरांनी तिला वाचवण्याचा प्रयत्न केला, परंतु ते अपयशी ठरले आणि तिला मृत घोषित केले.
स्टेट डिपार्टमेंट ऑफ पब्लिक सिक्युरिटी च्या मते, मुलीवर उपचार करणाऱ्या परिचारिकांना तिच्या योनीमध्ये रक्त आढळले. पोलिसांनी रुग्णालयाकडे हिंसाचाराबाबत माहिती मागितली असता, परिचारकांनी हिंसाचाराची कोणतीही चिन्हे तिच्या शरीरावर असल्याचे नाकारले. या 26 वर्षीय व्यक्तीने 15 वर्षांच्या मुलीशी संबंध असल्याचा दावा केला आहे. मात्र, मुलीच्या कुटुंबातील सदस्यांनी पोलिसांना सांगितले की, त्यांना आपल्या मुलीचे या व्यक्तीशी असलेल्या संबंधांची माहिती नव्हती. ब्राझीलमध्ये 14 वर्षावरील व्यक्तीस सेक्स करण्याची अनुमती आहे त्यामुळे त्या 26 वर्षीय पुरुषावर कोणताही लैंगिक गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.