कोरोना विषाणूचा (Coronavirus) कहर अजूनही जगभर सुरू आहे. आतापर्यंत कोविड-19 चे अनेक व्हेरिएंट समोर आले आहेत, ज्यामुळे कित्येक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या जगात डेल्टा प्रकाराणे चिंता निर्माण केल्या असता, बेल्जियममधून (Belgium) एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. येथे एका 90 वर्षीय वृद्ध महिलेस एकाच वेळी कोरोनाच्या दोन वेगवेगळ्या व्हेरिएंटचा संसर्ग झाला व त्यानंतर या वृद्ध महिलेचे निधन झाले. तपासणीत आढळले आहे की या महिलेला कोरोनाच्या अल्फा आणि बीटा (Alpha & Beta Variants) या दोन्ही प्रकारांची लागण झाली होती. या प्रकरणामुळे संशोधकांची चिंता वाढली आहे.
मीडिया रिपोर्टनुसार महिलेने कोरोनाची लस घेतलेली नव्हती. ती घरात एकटीच राहत होती. मार्च महिन्यात, महिलेची तब्येत अचानक बिघडली, त्यानंतर तिला बेल्जियमच्या अल्स्ट शहरातील ओएलव्ही रुग्णालयात दाखल केले. तिची कोरोना चाचणी केल्यानंतर ती सकारात्मक आली. त्यानंतर हळू हळू तिची तब्येत बिघडू लागली व अवघ्या पाच दिवसातच तिचा मृत्यू झाला.
त्यानंतर वैद्यकीय कर्मचार्यांनी, या महिलेचा मृत्यू कोविडच्या कोणत्या व्हेरिएंटने तर झाला नाही ना, हे तपासण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांना आढळले की महिलेला अल्फा आणि बीटा अशा दोन्ही प्रकारांची लागण झाली होती. हे दोन्ही प्रकार पहिल्यांदा यूके आणि दक्षिण आफ्रिकेत ओळखले गेले होते. ओएलव्ही हॉस्पिटलमधील मॉलिक्यूलर बायोलॉजिस्ट आणि रिसर्च टीमप्रमुख Anne Vankeerberghen म्हणाल्या की, ‘त्यावेळी हे दोन्ही प्रकार बेल्जियममध्ये वेगाने पसरत होते, कदाचित त्यामुळेच महिलेला दोन्ही प्रकारांचा संसर्ग झाला असावा मात्र हा संसर्ग नक्की कसा झाला हे स्पष्ट झाले नाही.’ (हेही वाचा: West Nile Virus in US: 7 राज्यांमध्ये पसरला धोकादायक असा 'वेस्ट नाईल व्हायरस'; अर्धांगवायूसह होऊ शकतो मृत्यू, जाणून घ्या सविस्तर)
Vankeerberghen पुढे म्हणाल्या, रुग्णांची तब्येत बिघडण्यामध्ये या दोन्ही प्रकारच्या संसर्गाची महत्वाची भूमिका होती का नाही, हे सांगणे कठीण आहे. हे संशोधन अद्याप कोणत्याही वैद्यकीय जर्नलमध्ये प्रकाशनासाठी सादर केलेले नाही