Shocking: बायकोचा खून करून तिच्या शरीराचे तुकडे शिजवून खाल्ले; विवाहबाह्य संबंधामुळे संसार झाला उध्वस्त
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: PTI)

आपले प्रेम (Love) मिळवण्यासाठी लोक कोणत्याही थराला जातात. कधी कधी तर एखाद्याला मारून टाकण्याइतपत त्यांची मजल जाते. असेच एक प्रकरण समोर आले आहे जिथे एका व्यक्तीने आपल्या बायकोचा खून तिला शिजवून खाल्ले. ही व्यक्ती दुसऱ्याच एका महिलेच्या प्रेमात पडली होती आणि त्याला तिच्याशी लग्न करायचे होते. परंतु यामध्ये बायकोचा मोठा अडसर होता, तिचा काटा काढण्यासाठी त्याने बायकोचा खून केला.

त्याने आधी बायकोचा खून केला, नंतर तिच्या मृतदेहाचे तुकडे करून ते चुलीत शिजवले. त्यानंतर त्याने ते ताटात सजवून पत्नीच्या मांसाची चव शांतपणे चाखली. पोलिसांना त्याच्याविरुद्ध कोणतेही ठोस पुरावे मिळू नयेत आणि तो आपल्या नवीन पत्नीसोबत आनंदाने राहू शकेल म्हणून त्याने हे सर्व केले. ही घटना ब्राझीलमधील आहे. जिथे मौरो सॅम्पिएत्री नावाच्या व्यक्तीने हा गुन्हा केला.

मौरो सॅम्पिएत्री, 59, आपली पत्नी क्लॉडेट सॅम्पिएत्रीसोबत आनंदाने राहत होता. त्यांचा संसारही छान सुरु होता. दोघांनीही बराच काळ एकमेकांना साथ दिली. पण जेव्हा मौरोच्या आयुष्यात नवीन व्यक्ती आली तेव्हा त्याला आपल्या बायोकोच्या गोष्टी खटकू लागल्या. त्याला लवकरात लवकर या नवीन महिलेशी लग्न करायचे होते, परंतु पहिली पत्नी असताना हे शक्य नव्हते. त्याला तिला आपल्या मार्गातून हटवायचे होते म्हणून त्याने तिला ठार मारले.

मात्र, पत्नी बेपत्ता झाल्यानंतर तिचा शोध घेण्यात आला आणि तिचे काही अवशेष घराजवळ सापडले, त्यानंतर पोलिसांनी मौरोला अटक केली. ही घटना जानेवारी 2017 मध्ये घडली होती. त्याला 21 वर्षांची शिक्षा झाली होती परंतु पोलिसांना चकमा देऊन मौरो तुरुंगातून पळून गेला. तुरुंगातून पळून जाऊन त्याने पुन्हा लग्न केले. सुमारे 5 वर्षांनंतर, आता पश्चिम-मध्य ब्राझीलच्या मातो ग्रोसो डो सुल राज्यातील कोरुंबा येथे पुन्हा त्याला पोलिसांनी अटक केली.