Shocking! मुलीला Burger King च्या जेवणात आढळली अर्धी जळालेली सिगारेट; घेतली फास्ट-फूड चेनमध्ये परत न जाण्याची शपथ
Burger King (Photo Credits: File Image)

याआधी उपहारगृहातील खाद्यपदार्थांमध्ये चित्र-विचित्र गोष्टी आढळल्याची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. आता अमेरिकेमध्ये (US) अशीच एक घटना समोर आली आहे, ज्याची सोशल मिडियावर चर्चा सुरु आहे. अमेरिकेतील एका मुलीला बर्गर किंग (Burger King) डिनरमध्ये अर्धी जळालेली सिगारेट (Half-Smoked Cigarette) आढळली आहे. जेवणात सिगारेट सापडल्याने मुलीला जणू काही मानसिक धक्काच बसला, कारण ही मुलगी या ठिकाणाहून नेहमी तिचे जेवण मागवत होती. मुलीला चिकन फ्राईजच्या पिशवीत अर्धी धुम्रपान केलेली सिगारेट सापडली.

मुलीचे नाव ब्लेझ (Blaze) असून, तिने तिची आई, जेन होलीफिल्ड (Jenn Holifield) सोबत बर्गर किंग आउटलेटमधून ही ऑर्डर घेतली होती. मिळालेल्या माहितीनुसार, ब्लेझ तिची आई जेनसोबत मिसिसिपी येथील मेरिडियन येथे बर्गर किंगमध्ये गेली होती. तिथे त्यांनी नऊ चिकन फ्राईज आणि काही पॉपर्सची बॅग मागवली. जेवण घेऊन त्या दोघी घरी गेल्या व खाणे सुरु केले. मात्र फ्राईजची पिशवी उघडताच ब्लेझला धक्का बसला, कारण आतमध्ये स्मोक्ड मेन्थॉल सिगारेट होती.

आईने दावा केला की, त्यानंतर तिने ताबडतोब स्टोअरला कॉल केला व ती तिथे परत गेली. त्यानंतर तीला पूर्ण परतावा देण्यात आला. कर्मचाऱ्यांनी बर्गरमध्ये सिगारेट टाकल्याचा आरोप महिलेने केला आहे. यावर बर्गर किंगच्या प्रवक्त्याने प्रतिक्रिया दिली की, ‘खरच अशी घटना घडली असेल तर ही गंभीर बाब आहे. बर्गर किंग आणि त्‍याच्‍या फ्रँचायझी पाहुण्‍यांना वाजवी किमतीत रुचकर आणि उत्तम प्रकारे तयार केलेले जेवण देण्‍यासाठी बांधील आहेत.’ या घटनेनंतर ब्लेझ आणि तिच्या आईने पुन्हा कधीही फास्ट-फूड चेनमध्ये परत न जाण्याची शपथ घेतली आहे. (हेही वाचा: ऐकावं ते नवलचं! अभिनेत्री किम कार्दशियन सारखं दिसण्यासाठी खर्च केले तब्बल $600 हजार पण आता असं काही घडली की पुन्हा खर्च करणार $120 हजार)

दरम्यान, याआधी अहमदाबाद येथील मॅकडोनाल्डच्या (McDonald’s) कोल्ड ड्रिंकमध्ये मृत पाल आढळली होती. या घटनेची छायाचित्रे सोशल मीडियावर समोर आल्यानंतर प्रशासनाने कारवाई करत हे आउटलेट सील केले.