Jennifer Pamplona : ऐकावं ते नवलचं! अभिनेत्री किम कार्दशियन सारखं दिसण्यासाठी खर्च केले तब्बल $600 हजार पण आता असं काही घडली की पुन्हा खर्च करणार $120 हजार

करु गेले काय आणि वरती झाले पाय! असचं काहीस मॉडेल जेनिफर पॅम्प्लोना (Model Jennifer Pamplona) बरोबर घडलं आहे. कुणाच्या असण्याची किंवा दिसण्याची किती फॅन फॉलोविंग (Fan Folllowing) असावी याच्या सगळ्या हद्द मॉडेल जेनिफर पॅम्प्लोना हिने पार केल्या आहेत. अभिनेत्री किम कार्दशियन (Kim Kardashian) ही जगातीग सगळ्यात सुंदर स्त्रीयांपैकी एक आहे. तिच्या एवढं देखणं असावं असा हेवा जगातील सगळ्याच तरुणींना वाटू शकतो पण तिच्या सारखं दिसण्यासाठी मॉडेल जेनिफर पॅम्प्लोना हिने असं काही केलं की ते ऐकून तुम्हाला धक्का बसेल.

 

अभिनेत्री किम कार्दशियन सारखं दिसण्यासाठी मॉडेल जेनिफर पॅम्प्लोना हिने स्वत:वर 40 कॉस्मेटिक ऑपरेशन्स (Cosmetic Operations) करवून घेतले ज्यासाठी  तिला बारा वर्ष लागलीत. म्हणजेच वयाच्या 17 व्या वर्षीपासून तिने या सर्जरी करण्यास सुरुवात केली तर आज वयाच्या 29व्या वर्षी पर्यत तिने 40 कॉस्मेटिक ऑपरेशन्स करवून घेतले आहेत. या सर्जरी करण्यासाठी तिला तब्बल $600 हजार एवढा खर्च आला. पॅम्प्लोनाने एवढ्या शस्त्रक्रीया केल्यात की आता तीला शस्त्रक्रियेचं व्यसन लागलं असं म्हणनं चुकीचं ठरणार नाही. (हे ही वाचा:-Nagin Dance Viral Video: रोडच्यामध्ये बाइकर्सचा ट्रकच्या हॉर्नवर 'नागिन डान्स' (Watch Video))

 

जेनिफर पॅम्प्लोना सांगते मी माझ्या वैयक्तीक, व्यवसायिक किंवा आर्थिक आयुष्यातही कार्दशियन सारखी उपलब्धी मिळवली पण लोक मला कार्दशियन म्हणायचे कारण मी तिच्या सारखी दिसायचे आणि काही दिवसांनंतर मला हेच खटकू लागले. म्हणून आता  जेनिफर परत एकदा सर्जरी करवून  घेणार असून तिला तिच्या पूर्वीचा लुक पुन्हा हवा आहे. इस्तंबूलमध्ये (Istanbul) एक डॉक्टर  ज्याने दावा केला की तिला तिच्या पूर्वीच्या स्वरूपावर परत येण्यासाठी मदत करू शकते. तर आता मॉडेल जेनिफर पॅम्प्लोना पुन्हा एकदा सर्जरी करणार असुन या सर्जरीचा खर्ज खर्च करणार $120 हजार एवढा येणार आहे.