भारतामध्ये 3 वर्ष बंदी नंतर चीनी ऑनलाईन फास्ट फॅशन ब्रॅन्ड Shein पुन्हा भारतामध्ये पाऊल ठेवण्यासाठी सज्ज झालं आहे. Reliance Retail च्या साथीने Shein पुन्हा भारतीय बाजरपेठांमध्ये दिसणार असल्याची माहिती समोर आली आहे. Shein या अॅप वर Ministry of Electronics and Information Technology कडून जून 2020 मध्ये बंदी घालण्यात आली होती. काही वर्षांपासून सीमावादातून निर्माण झालेल्या तणावानंतर अनेक चीनी अॅप्सवर बंदी घालण्यात आली होती त्यामध्ये Shein चा समावेश आहे.
आता Shein ने रिलायन्स रिटेलसोबत भागीदारी केली आहे आणि ती मुकेश अंबानींच्या रिलायन्स इंडस्ट्रीजच्या मदतीने जागतिक स्तरावर सर्वात वेगाने वाढणाऱ्या फॅशन मार्केटपैकी एक होण्याचा प्रयत्न करेल. Shein, ज्याला यूएस ओव्हर सोर्सिंग करत आहे. त्यांच्याकडून माल खरेदी करून तो मिडल ईस्ट आणि अन्य मार्केट्स मध्ये दाखल केला जातो.
मीडीया रिपोर्ट्सनुसार, दोन्ही कंपन्यांमधील करारानुसार, Shein रिलायन्स रिटेलच्या सोर्सिंग क्षमता, वेअरहाउसिंग आणि लॉजिस्टिक इन्फ्रास्ट्रक्चर तसेच किरकोळ विक्रेत्याच्या ऑनलाइन आणि ऑफलाइन स्टोअरच्या पोर्टफोलिओमध्ये प्रवेश करू शकते. Chinese Links Apps Ban in India: चीनशी संबंधीत 138 बेटिंग अॅप्स, 94 लोन लेंडिंग अॅप्सवर भारतात बंदी, केंद्र सरकारचा निर्णय .
Shein ची सुरूवात 2008 मध्ये झाली आहे. Shein वर परवडणाऱ्या किमतीमध्ये फॅशनेबल कपडे घेण्यासाठी ग्राहकंचा ओढा असतो. ट्रेंडी महिलांच्या कपड्यांची Shein वर क्रेझ आहे.
सरकारने 59 अॅप्ससह त्यावर बंदी घातली होती, त्या वेळी म्हटले होते की या प्लॅटफॉर्ममुळे "सार्वभौमत्व आणि अखंडतेला धोका" आहे. पण शीन उत्पादने अॅमेझॉनच्या रूपात ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मद्वारे ऑनलाइन बाजारात उपलब्ध होती. दरम्यान हा मुद्दा यापूर्वी दिल्ली उच्च न्यायालयासमोरही मांडण्यात आला होता.