Smart Sex Toy (Photo Credits: YouTube Grab)

आजकाल जगभरात सेक्स टॉयची (Sex Toy) लोकप्रियता आणि मागणी प्रचंड वाढली आहे. परंतु जसे या सेक्स टॉयचे फायदे आहेत तसेच काही तोटेही आहेत. नुकतेच सेक्स टॉय बनवणार्‍या एका कंपनीला 2.4 मिलियन पौंड म्हणजेच सुमारे 24 कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. कंपनीवर आरोप आहे की, त्यांनी ग्राहकांची फसवणूक करत, त्यांच्या नकळत त्यांच्या लैंगिक गतिविधींचा मागोवा घेतला गेला. म्हणजेच ग्राहकांना न माहिती होता या सेक्स टॉयच्या मदतीने त्यांच्या लैंगिक क्रियेवर लक्ष ठेवण्यात आले.

Lad Bible च्या रिपोर्टनुसार याबाबत 2017 मध्ये खटला दाखल करण्यात आला होता. आरोप होता की, कॅनेडियन ब्रँड We-Vibe ने आपल्या 'स्मार्ट व्हायब्रेटर'च्या (Smart Vibrators) मदतीने त्यांच्या ग्राहकांच्या लैंगिक क्रियांवर लक्ष ठेवले. या खटल्याचा परिणाम म्हणून कंपनीला प्रति ग्राहक £6,120 (रु. 6 लाखांहून अधिक) रुपये आकारले गेले, जे त्यांनी मान्य केले.

सर्वात प्रथम इलिनॉयमध्ये सेक्स टॉय निर्मात्याची मूळ कंपनी स्टँडर्ड इनोव्हेशन विरुद्ध एक क्लास अॅक्शन सूट दाखल करण्यात आला होता. त्यावेळी कंपनीने 24 कोटी रुपयांची नुकसान भरपाई देण्याचे मान्य केले. यातील संबंधित अॅप तसेच व्हायब्रेटर वापरणाऱ्या ग्राहकांसाठी 6 लाख रुपये व ज्यांनी फक्त सेक्स टॉय विकत घेतले आहे त्यांना 12 हजार रुपये देण्यात ठरले. सेक्स टॉय We-Vibe 4 ची किंमत £90 (रु. 9,000 पेक्षा जास्त) आहे. जगात कुठूनही अॅपद्वारे ते नियंत्रित केले जाऊ शकते. अॅपमध्ये त्याचा वापरही स्पष्ट करण्यात आला आहे. (हेही वाचा: New Sex Survey: फक्त उत्स्फूर्त सेक्सच सर्वात कामुक आणि समाधानकारक असू शकत नाही; लैंगिक संबंधाच्या नवीन अभ्यासात खुलासा)

मात्र, हे अॅप त्यांच्या लोकांच्या लैंगिक क्रियाकलापांवर लक्ष ठेवत असल्याचे नंतर लोकांना समजले. वापरकर्त्यांनी किती वेळा आणि किती तीव्रतेने या व्हायब्रेटरचा वापर केला यांचा डेटा एकत्रित केला. न्यायालयीन कागदपत्रांनुसार, अंदाजे 300,000 लोकांनी ब्लूटूथ सक्षम WeVibe उत्पादने खरेदी केली होती. यापैकी सुमारे एक तृतीयांश लोकांनी हे अॅप वापरले होते. स्टँडर्ड इनोव्हेशन्सने यावर जोर दिला की ही, ही माहिती केवळ टेस्टसाठी (Diagnostic Purposes) वापरली गेली होती, मात्र युजर्सचा यावर विश्वास बसला नाही.