Serial killer | (Photo courtesy: archived, edited images)

विकृतीचा कळस गाठणाऱ्या एका सीरियल किलरला (Serial Killer) अमेरिका (America) पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सॅम्यूअल (Samuel)असे या क्रूरकर्मा नराधमाचे नाव आहे. आजवर त्याने तब्बल 90 जणांचे प्राण घेतले आहेत. या सर्व हत्यांची त्याने पोलिसांना कबूलीही दिली आहे. धक्कादायक असे की, हा क्रूरकर्मा सध्या 78 वर्षांचा असून, लोकांची हत्या करताना तो हस्तमैथून करत असे आणि मग त्यांचा गळा दाबत असे. सॅम्यूअलने केलेल्या एकूण हत्यांपैकी बहुतांश महिला आहेत. तसेच, त्या एकतर वेश्या आहेत किंवा सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या अगदीच गरीब आहेत. विशेष म्हणजे हत्या केलेल्या सर्व लोकांचे चेहरे अद्यापही त्याल स्पष्टपणे आठवतात.

पोलिसांना दिलेल्या माहितीत क्रूरकर्मा सॅम्यूअलने सांगितले की, त्याने केलेल्या सर्व हत्या कॅलिफॉर्निया ते फ्लोरिडापर्यंत आहेत. सॅम्यूअलची हत्या करण्याची पद्धतही विशिष्ट होती. हत्या केल्यानंतर तो एकही पुरावा मागे सोडत नसे. हत्येपूर्वी तो महिलेला बेशुद्ध करत असे. त्यानंतर मनसोक्त हस्तमैथून करत असे. आणि मग अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने त्यांचा गळा दाबत असे. त्याने सांगितलेली हत्येची पद्धत ऐकून पोलिसही काहीवेळ चक्रावून केले. सीरियल किलर सध्या तुरुंगात रवानगी करण्यात आली असून, त्याने केलेल्या हत्यांचा पोलीस तपास करत आहे. आरोपीने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार त्याने केलेल्य सर्वाधिक हत्या या १९७० ते १९८० या काळातील आहेत.

आरोपीने आतापर्यंत 90 हत्या केल्याचे सांगितले आहे. मात्र, त्याने एकूण 90 हत्याच केल्य आहेत की, हा आकडा त्याहून मोठा आहे याबाबत पोलिस तपास करत आहेत. आरपीने दिलेली आणखी एक धक्कादायक बाब अशी की, आपण करत असलेल्या कृत्याची पूर्ण जाणीव आरपीला होती. त्यामुळे आपण पोलिसांच्या हाती लागू नये यासाठी आपण गेली चार दशकं विविध देशांमध्ये फिरत असल्याचेही आरोपीने सांगगितले आहे. दरम्यान, कारागृहात असलेल्या आरोपी सॅम्यूअलने आपल्याला दुसऱ्या कारागृहात पाठवावे अशी मागणी केली आहे. (हेही वाचा, विकृत नवऱ्याच्या सुखाची तृप्ती करण्यासाठी क्रूर आईने 4 महिन्यांच्या बाळाची 28 हाडे तोडली)

आरोपीने कारागृह बदलून देण्याची मागणी केल्याला एफबीआयने दुजोरा दिला आहे. मात्र, त्याने ही मागणी का केली आहे,याबाबत एफबीआयने तपशील दिला नाही. आपली पुढील शिक्षा टेक्सास कारगृहात घालवण्याची आरोपीची इच्छा आहे. एका महिलेच्या हत्या प्रकरणात पोलिसांनी त्याला अटक केली होती.